Parbhani News : आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची अनेक उदाहरणे सातत्याने समोर येतात. परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात (parbhani general hospital) तर 108 रुग्णवाहिकेतून (108 ambulance service) तीन रुग्ण उपचारासाठी आणण्यात आले. मात्र रुग्णवाहिकेचा दरवाजा न उघडल्याने तब्बल अर्धा तास रक्तबंबाळ अवस्थेतीतील रुग्णांना रुग्णवाहिकेतच अडकून बसण्याची वेळ रुग्णांवर आली. (Maharashtra News)
रविवारी जिंतूर (jintur) तालुक्यातील पुंगळा येथे दोन गटांत हाणामारी झाली. यात तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचाराची आवश्यकता असल्याने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमींना (injured) (एमएच 14 सीएल 1981) या 108 रुग्णवाहिकेतून परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.
तेथे आणल्यानंतर रुग्णवाहिकेचा दरवाजाच उघडत नव्हता. दरवाजा उघडण्यासाठी रुग्णालय परिसरातील अनेक जण प्रयत्न करत होते मात्र दरवाजा उघडत नव्हता. यात तब्बल अर्धा तास निघून गेला.
या जखमींना उपचाराविना अर्धा तास रुग्णवाहिकेतच अडकून राहावे लागले. अखेर लोखंडी तांबीच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. जखमींना तातडीने उपचारासाठी (hospital) दाखल करण्यात आले. दरम्यान आणखी काही वेळ दरवाजा उघडा नसता तर ते जखमींच्या जीवावर बेतले असते असे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही मानवत येथे असा प्रकार घडला होता. मात्र अदयापही रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.