Pimpri Chinchwad Crime News : नागरिकांच्या सतर्कतेमुळे बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, झटापटीनंतर चाैघे अटकेत, चाैघांचा शाेध सुरु

वाकड पोलिसांनी दरोडेखोरांचा प्रतिकाराला न जूमानता धरपकड सुरु ठेवली.
Pimpri Chinchwad
Pimpri Chinchwadsaam tv

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक परिसरात नऊ जूलैच्या तारखेच्या मध्यरात्री सात- आठ दरोडेखोरांनी एका दुकानाचे लोखंडी शटर उचकटून फेडरल बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे ताे फसला आणि काही दराेडेखाेर जेरबंद झाले. (Maharashtra News)

Pimpri Chinchwad
Sangli News : भेंडीचा दर गडगडला, हताश शेतकऱ्यानं पिकात साेडली मेंढरं; व्यापा-यांवर आराेप

या बँकेत दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांनी बँकेच्या भिंतीला ड्रिल मशीनच्या सहायाने एक मोठ छिद्र केले होते. मात्र काही सजग नागरिकांना दरोडेखोराची कुणकुण लागताच त्यांनी वाकड पोलिसांना लगेच त्याबाबतची माहिती दिली. यामुळे दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला.

Pimpri Chinchwad
Archery World Cup : जागतिक तिरंदाजी स्पर्धा : मराठमाेळ्या आदिती स्वामीचा विश्वविक्रम, 16 व्या वर्षी घडविला इतिहास

दरोडेखोर बँकेत दरोडा टाकण्यासाठी बँकेची भिंत फोडत असतानाच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दरोडेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाकड पोलिसांनी दरोडेखोरांचा प्रतिकाराला न जूमानता धरपकड सुरु ठेवली.

Pimpri Chinchwad
Pune Crime News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या, दोघे पाेलिसांच्या ताब्यात

पाेलिसांनी चार दरोडेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली. यामधील चार दरोडेखोर अजूनही पसार आहेत. पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांकडून गॅस कटर, ड्रिल मशीन, स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार दरोडेखोरांना ताब्यात घेण्यासाठी वाकड पोलिसांनी काही पथक तयार केली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com