Vinod Tawde diary India Today
Maharashtra Assembly Elections

Vinod Tawde:वाडा ते वसई आणि हॉटेलमधील राडा; पैसे वाटपाच्या आरोपावर विनोद तावडेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Vinod Tawde: विरार येथील हॉटेलमध्ये काय गोष्टी घडलल्या याचा संपूर्ण घटनाक्रम भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलाय.

Bharat Jadhav

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप झाला. मुंबईतील विरारमध्ये असलेल्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत पैसे वाटत होते, असा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्याकडील डायऱ्या आणि पैसे दाखवत विनोद तावडे यांना जाब विचारला.

विरार हॉटेलमध्ये घडलेल्या राड्यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेत भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. आपण पैसे वाटत नव्हतो, फक्त कार्यकर्त्यांशी गप्पा मारायला गेलो होतो. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटजे तपासावेत. त्यातून दूध का दूध, पानी का पानी होईल, अस म्हणत विनोद तावडे यांनी संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सांगितलाय.

विनोद तावडे यांच्याकडे ५ कोटी रुपये असल्याचा दावा बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला.दरम्यान भाजपचे नेते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होताच विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारलाय. राहुल गांधींच्या ट्विटला उत्तर देत विनोद तावडे यांनी त्यांना नालासोपाऱ्यात येण्याचं आणि तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचं आव्हान केलं.

विनोद तावडे यांच्याकडील बॅगमध्ये काही डायऱ्या सापडल्या यात काही लोकांची नावे होती. त्या नावांपूढे काही लिहिण्यात आली होती. किती पैसे देण्यात आले याची नोंद असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान विनोद तावडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या पैसे वाटण्याचे आरोप फेटाळून लावलेत.तर भाजप नेत्यानेच विनोद तावडे हे पैसे वाटण्यासाठी येणार असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. त्यावरही विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपण पैसे वाटलेच नाही तर भाजप नेत्याने टीप दिली याचा प्रश्न येत नाही, असं तावडे म्हणालेत.

विनोद तावडे यांनी सांगितला घटनाक्रम

वाडा येथून आज मी मुंबईला परतत असताना वसई परिसरात आल्यावर स्थानिक भाजपा उमेदवार राजन नाईक यांना चौकशीसाठी फोन केला. आम्ही सर्व कार्यकर्ते वसई येथे एका हॉटेलमध्ये आहोत, आपण चहाला या, असे त्यांनी सांगितले. मी तेथे पोहोचल्यावर स्वाभाविकपणे निवडणुकीची चर्चा झाली. मतदानाच्या दिवशीची तांत्रिक प्रक्रिया व आपण घ्यायची काळजी याविषयी मी बोलत होतो. त्यावेळी अचानक काही कार्यकर्ते आले व त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे करून आरडाओरडा सुरू केला.

हे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे असल्याचे समजल्यानंतर मी त्या पक्षाचे प्रमुख मा. हितेंद्र ठाकूर यांना फोन केला व आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवरावे, अशी विनंती केली. मा. हितेंद्र ठाकूर व आ. क्षितीज ठाकूर तेथे आले. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो.

त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. मा. राहुल गांधी व मा. सुप्रिया सुळे अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत मा. निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी, असं तावडे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT