विरारमध्ये भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. तावडे यांच्याकडे सापडलेल्या डायरीत काही नावे आढळून आलीत. त्याप्रकरणावरून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केलीय. दरम्यान विनोद तावडे पैसे वाटायला जाणार असल्याची टीप ही भाजप नेत्यानेच दिल्याचा दावा बविआ प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. आता त्यावर विनोद तावडे यांनी मोठं विधान केलंय.
हॉटेलमधून बाहेर जाताना हितेंद्र ठाकूरसोबत कारमध्ये काय चर्चा झाली हे मला माहिती असल्याचं तावडे म्हणालेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत प्रश्न केले जात आहेत. विरार पूर्वच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे पैशांची बॅग घेऊन गेले आणि पैशांची वाटप केली, असा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. मात्र विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
याप्रकरणी निवडणूक आयोगाने दखल घेत, तावडेंसह राजन नाईक, आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावर कारवाई केलीय. दरम्यान विनोद तावडे यांना हॉटेल मध्ये घेरल्यानंतर बविआ प्रमुख हितेंद्र ठाकूर म्हणाले, तावडे तेथील हॉटेलमध्ये पैसे वाटायला येणार असल्याची टीप भाजपमधील नेत्यानेच दिल्याचा दावा त्यांनी केलाय. त्याचबरोबर संजय राऊत यांनीही त्यांच्या दाव्या दुजोरा दिलाय. यामुळे भाजपमधून कोणत्या नेत्याने टीप दिली असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर तावडेंनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
मी कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारायला आणि त्यांच्यासोबत चहा प्यायला गेलो होतो. माझ्यावर तीन गुन्हे दाखल झालेत, पण पैसे वाटण्यावरून कोणताच गु्न्हा नाहीये. पैसे वाटण्याच्या बातम्या खोट्या असल्याचा दावा भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलाय.विरार-नालासोपारा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मी गेलो होतो.
त्याचवेळी हिंतेंद्र ठाकूर यांचे कार्यकर्ते तेथे आले आणि पैसे वाटल्याचा आरोप करू लागले. निवडणूक आयोग, पोलीस, राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांनी तेथे येऊन सीसीटीव्ही तपासावेत. पैसे वाटले असतील त्याचा तपास करावा. येथून मी विधान परिषदेचं मत हितेंद्र ठाकूर यांच्याकडून मिळवलंय. आता बाहेर सोडताना हिंतेंद्र ठाकूर यांनी सोडलं. ४० वर्ष राजकारण केलंय फुटकी दमडी कधी कोणाला दिली नाही.
जर त्यांना शंका आली असेल तर निवडणूक आयोगाने चौकशी करावी असं विनोद तावडे म्हणालेत. माझ्यावर तीन गुन्हे दाखल झालीय, एक पत्रकार परिषद घेतल्यामुळे एक गुन्हा दाखल झाला. दुसरा गुन्हा माझा मतदारसंघ नसताना मी तेथे गेलो. आणि तिसरा नोंदवण्यात आलेला गुन्हा हा हितेंद्र ठाकूर हे मतदारसंघ नसताना तेथे आले.पैशाचा एकही एफआयर नसल्याचा खुलासा विनोद तावडे यांनी केलाय. पैशा संदर्भातील सर्व बातम्या पूर्णत:खोट्या आहेत.
हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की, भाजप नेत्यानेच टीप दिल्याच सांगतात. परंतु हे सर्व खोटं आहे. नंतर गाडीत जाताना हितेंद्र ठाकूर यांनी काय सांगितलं तेही मला माहिती आहे. प्रचार संपल्यानंतरही तुम्ही तेथे गेला का असा प्रश्न विचारल्यानंतर तावडे म्हणाले, मतदारांची भेट घेतल्यानंतर परत जात असताना राजन यांना फोन केला.
त्यांच्याकडून माहिती घेतली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही काही कार्यकर्त्यांसोबत चहा घेतोय तुम्हीही या. मग मी तेथे गेलो इतकं साध सरळ गणित आहे, असं तावडे म्हणाले. युती असताना मी आणि उद्धव ठाकरे अनेकवेळा मतदारसंघात फिरलोय. पण शंका आली आहे तर निनडणूक आयोगाने नक्की तपास करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.