Nana Patole - Uddhav Thackeray Saamtv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीस यांच्यात भेट, काँग्रेसच्या सूत्राचा मोठा दावा, मविआत फाटले?

Congress Shiv Sena Clash :काँग्रेसनेही स्वबळाची तयारी केल्याचे समोर आलेय. जागा वाटपावरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहचलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची तयारी केल्याची बातमीने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता काँग्रेसच्या गोटातूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरु केलीची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जवळकी वाढली आहे, संजय राऊत आणि अमित शाह यांच्यामध्ये दिल्लीत भेट झाली. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचाही भेट झाल्याच दावा काँग्रेसच्या सूत्राने केला आहे. (Maharashtra Election 2024 Congress Uddhav Thackeray Shiv Sena UBT Seat Sharing Clash in Vidarbh)

दरम्यान, जागा वाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे यांच्यामध्ये वाद शिगेला पोहचला होता. विदर्भातील जागावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या बैठकीत यावर तोडगा निघणार होता. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगलीचे उदाहरण देत नरमाईची भूमिका घेऊ नये, असे दिल्लीमध्ये वरिष्ठांना सांगितल्याचं समजतेय.

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शरद पवारांनी मध्यस्थी केली, ती यशस्वी ठरल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यातच आता काँग्रेसमधील सूत्राने केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मातोश्रीवर बैठकीला गेल्यानंतर ठाकरे भाजपसोबत जातील, असा अंदाज आल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय ठाकरे आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढल्याचाही दावा केला आहे. संजय राऊत आणि अमित शाह यांच्यामध्ये भेट झाली. त्याशिवाय राज्यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गुप्त भेट झाल्याचा दावाही काँग्रेसच्या सूत्रांनी केला आहे. भाजप उद्धव ठाकरेंसोबत जवळीक वाढवत आहे. त्यांच्यामध्ये बिहार फॉर्म्यूल्यावर चर्चा झाल्याचा दावाही काँग्रेसमधील सूत्रांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे यांच्यामध्ये विदर्भातील काही जागांवरुन वाद आहे. विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसमोर तसे स्पष्टपणे सांगितलेही होते. पण आज आमच्यात तोडगा निघेल असेही ते म्हणाले होते. त्यात संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर नरमाईची भूमिका घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT