Maharashtra Assembly Elections

Nitin Gadkari: अर्धा पगार तुम्ही, अर्धा आम्ही अन् गावोगावी रोजगार हमी; काँग्रेसवर नितीन गडकरींचा हल्लाबोल

Nitin Gadkari : अंबड येथील महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सभा घेतली. यावेळी त्यांनी शेलक्या शब्दात काँग्रेसवर टीका केली.

Bharat Jadhav

पंडीत जवाहरलाल नेहरू जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून काँग्रेसने जे धोरणं स्विकारली. त्याचा विचार केला आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर आपलं खूप मोठं नुकसान झालं असं टीका नितीन गडकरींनी केली. आम्ही १० वर्षाचे काम केलं ते काँग्रेसवाले ६० वर्षात करू शकले नाही. काँग्रेस देशाचा विकास करू शकली नसल्याची टीका ही गडकरींनी केलीय. ते जालना अंबड येथील प्रचार सभेत बोलत होते.

जालन्यातील बदनापूर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अंबड येथे सभा घेतली. ज्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेसने स्टील उद्योग, सोन्याचा खाणी,कोळशाच्या खाणी यात देशाचा पैसा गुंतवला.परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं हा व्यापार करण्यात नुकसान झालं.अनेक उद्योगाचं दिवाळं झालं.पण त्यावेळी जर रस्ते झाले असते. शेतकऱ्यांच्या सिंचन समस्या सोडवल्या असत्या. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केले असते. गावात उत्तम दवाखाना, शाळा करण्यात हा पैसा गुंतवला असता आज देश वेगळा राहिला असता.

त्याकाळी शाळांची स्थिती अशी होती की, जेव्हा शाळां भिंती नव्हत्या तर शिक्षक होते. आणि शिक्षक होते तर विद्यार्थी नव्हते. दवाखान्याची स्थितीही तशीच होती. डॉक्टर असेल तर नर्स नाही आणि नर्स असेल तर डॉक्टर नाही आणि दोघेही असतील तर औषधे नाहीत अशी स्थिती त्याकाळी होती.तिन्ही गोष्टी असल्यातर रुग्ण दवाखान्यात जात नव्हते अशी स्थिती होती. ग्रामीण भागाकडे काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं नाही. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला पण कोणाची गरिबी हटली, असा प्रश्न नितीन गडकरींनी केला. काँग्रेसने केलेल्या गरिबी हटावचा नारा दिला त्यातून कोणाची गरिबी हटली. शेत मजुरांची गरिबी हटली का? शेतकऱ्यांची गरिबी दूर झाली का? पण त्या नाऱ्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची गरिबी हटल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला.

गरिबी हटवताना काँग्रेस नेत्यामधील कोणाला मेडिकल कॉलेज, तर कोणाला डीएड, बीएड, कॉलेज मिळाले तर कोणाला प्राथमिक शाळा मिळाल्या. त्यावेळी काँग्रेसने शिक्षकांना अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार आम्ही आणि गावागावात रोजगार हमी अशी योजना सुरू केल्या असा आरोप नितीन गडकरींनी केली. आज देशात आणि राज्यात १० वर्षात जे काम झालं ते काँग्रेसच्या ६० वर्षाच्या काळात झाले का असा सवालही नितीन गडकरींनी केला. कालांतराने काँग्रेस पक्ष बदल गेला. त्याचे वेगवेगळ्या पक्ष झाले परंत देशाची प्रगती झाली नसल्याचं आरोपही गडकरी म्हणालेत.

देशामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रस्त्याची काम सुरू आहे. बारा हजार कोटी रुपये मी महाराष्ट्राला दिले. आता पुणे ते छत्रपती संभाजी नगरसाठी एक रस्ता तयार करणार अशून त्या हायवेमुळे दोन तासात पुणे गाठता येणार. त्यानंतर जालनाच्या हायवेला तो रस्ता जोडला जाईल. त्यानंतर तोच हायवे नागपूरला जाईल. म्हणजेच मोजून ६ तासात तुम्ही नागपूरला जाणार. दिल्ली मुंबईसाठी रोड तयार केला जात असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.

जातीवादावर काय म्हणाले गडकरी

मला सगळ्या जातींनी मतदान केलं. माणूस जात पंथ भाषेने मोठा होत नाही, माणूस आपल्या गुणांनी मोठा होतो . आपण एकनाथ महाराजांची जात काय आहे हे पाहतो का. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची जात पाहतो का? आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जात विचारतो का? माणसाचा मोठेपणाचा संबंध त्याची जात, भाषेशी नाही. मी लोकसभेला उभा होतो आमच्याकडेही जातीवादाचे भूत होते, मी पंचवीस हजार लोकांसमोर सांगितलं मी नागपूरचा आहे, जो करेगा जात की बात, उसे कसके मारूंगा लाथ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT