Uddhav Thackeray Saam
Maharashtra Assembly Elections

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्या संघर्ष सुरूय. प्रत्येक सभेत भाजप आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र सिल्लोड विधानसभा मतदारसंघात मात्र दोघांची युती झालीय.

डॉ. माधव सावरगावे

Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीत भाजप-युतीविरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे - महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू आहे. मात्र सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांमुळे भाजप आणि उद्धव सेनेचे सूर जुळलेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीच भाजपला हाक दिली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना उद्धव ठाकरे यांनी थेट भारतीय जनता पार्टीलाच साद घातलीय. आपले मतभेद बाजूला ठेवू पण एकत्र येऊ असं सांगताना ही शेवटची संधी आहे असं भाजपला म्हणालेत.

गद्दाराला गाडण्यासाठी, गुंडगिरी आणि सर्वसामान्याच्या छळ थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाक दिलीय. पण उद्धव ठाकरेंचं हे भाषण ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. राज्यात एकीकडे दररोज मोदी शहा फडणवीसांवर उद्धव ठाकरे हे हल्लाबोल करतायत पण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाला सोबत येण्याचे आवाहन केले.

हे भाषण सुरू असताना भाजपचे अनेक पदाधिकारी त्यांच्या व्यासपीठावर होते आणि गर्दीतही भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भाजपचे अनेक पदाधिकारी उघडपणे सत्तार विरोधात प्रचार करू लागले आहे. काही दिवसापूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आम्ही अब्दुल सत्तार यांचा प्रचार करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते.

आज भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काही ठिकाणी गुप्त पद्धतीने तर काही ठिकाणी उघडपणे सत्तार विरोधात काम करत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सिलोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी भाजप विरोधात काम केले.

रावसाहेब दानवे यांचा पराभव मीच केला असे ते उघडपणे सांगू लागले त्यामुळे भाजप संपवणारे अब्दुल सत्तार यांना आम्ही कसे मतदान करणार आणि त्यांच्या प्रचार कसा करणार असा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे ही आई ती संधी साधून उद्धव ठाकरे यांनी भाजपला सात घातलेली आहे. इसाद स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी ऐकतील पण राज्यातील नेते त्याला काय प्रतिसाद देतात हे पहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT