Sangli Politics 
Maharashtra Assembly Elections

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

Sangli Politics: सांगली पॅटर्न पुन्हा सांगलीतच पाहायला मिळालाय. जयश्री वहिनी ह्या माझ्याच उमेदवार त्यांना निवडून द्या. विशाल विशाल पाटील यांनी आव्हान केले आहे.

Bharat Jadhav

विजय पाटील, साम प्रतिनिधी

सांगलीत विधानसभेतही लोकसभेप्रमाणेच पॅटर्न पाहायला मिळालाय. काँग्रेस खासदाराने अधिकृत उमेदवाराऐवजी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिलाय. खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा सांगली पॅटर्न राबवत बंडखोरी करून जयश्री वहिनी पाटलांना पाठिंबा दिलाय. जयश्री पाटील हे माझेच उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्या, असे जाहीर आव्हान देखील त्यांनी केले. त्यामुळे सांगलीमध्ये आता तिरंगी लढत मिळणार आहे. मात्र सांगली काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचं दिसून आलंय.

सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील तर भाजपचे उमेदवार सुधीर गाडगे आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री वहिनी पाटील यांच्यामध्ये ही लढत होत आहे. आज जयश्री वहिनी पाटील यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत भव्य सभा सांगलीच्या काँग्रेस कमिटी समोर घेतली. यावेळी या सभेला खासदार विशाल पाटील आणि त्यांचे भाऊ माजी मंत्री प्रतीक पाटील हेही उपस्थित होते.

यावेळी विशाल पाटील म्हणाले, मी सर्वांची क्षमा मंगतो. जयश्री वहिनी याना उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही. विश्वजित कदम यांनी कमी पडलो. तसेच आमच्या वसंतदादा कुटुंबाला एकदा ही काँग्रेस पक्ष कडून उमेदवारी मिळाली नाही. काय नेमकी चूक या वसंतदादा घराण्याने केलेले आहे काँग्रेस पक्षाबाबत हे अजून आम्हाला कळालं नाही. निष्ठा आम्ही सोडली नाही. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला हा का न्याय होत गेला हे अध्यापिक कळू शकले नाही.

जयश्री वहिनी माझ्या उमेदवारी सर्वात पुढे होत्या मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये अशी शंका निर्माण झाली. ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा ह्याच विकास आघाडीचा घटक आहे. काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करणाऱ्या सारखा सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे. हा माझा उमेदवार आहे हे मी जाहीर करतो. येणाऱ्या निवडणुकीत जयश्री वहिनी यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदाच महिला आमदार निवडणार आहे. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिला आहे. तसेच माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या असे विशाल पाटील यांनी केले आवाहन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT