Maharashtra Election: अनेक मतदारसंघात मविआ अन् महायुतीसमोर बंडोबांचं टेन्शन; कुठे-कुठे कायम आहे बंडखोरी

Maharashtra Election: महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन बंडखोर उमेदवारांनी वाढवलंय. अनेक मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपला निर्णय काय ठेवत दोन्ही युत्यांची चिंता वाढवलीय.
Maharashtra Election: अनेक मतदारसंघात मविआ अन् महायुतीसमोर बंडोबांचं टेन्शन; कुठे-कुठे कायम आहे बंडखोरी
Maharashtra Election
Published On

विधानसभा निवडणुकीत बंडखोरांनी महाविकास आघाडी आणि महायुतीची चिंता वाढवलीय. अनेक मतदारसंघात बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतली मात्र काही ठिकाणी बंडोबांनी दोन्ही युतींचे टेन्शन कायम ठेवलं आहे. या संघर्षात नांदगावदेखील वेगळं नाहीये. नांदगाव येथे चौरंगी लढत होणार असल्याने सुहास आण्णा कांदे यांची चिंता वाढलीय. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी मतदानासाठी शिट्टी निशाणी घेतलीय. दरम्यान नांदगावप्रमाणेच राज्यातील अनेक ठिकाणी बंडखोरी कायम आहे. कोण-कोणत्या मतदारसंघात बंडखोरी कायम आहे त्याचा आढावा घेऊ.

वाशिम विधानसभा मतदारसंघातही बंडखोरी कायम आहे. महाविकास आघाडीकडून डॉ.सिद्धार्थ देवळे यांना शिवसेना उद्धव ठाकरे (गट ) कडून उमेदवारी देण्यात आलीय. मात्र येथे ठाकरे गटातील मदन उर्फ राजा भैया पवार हे निवडणुक लढवण्यास इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आवाहन असणार आहे.

नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झालीय. भाजपकडून आमदार तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आलीय. येथे शिंदे गटाचे नेते बालाजी पाटील खतगावकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. येथे काँग्रेसकडून माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर रिंगणात आहेत.

Maharashtra Election: अनेक मतदारसंघात मविआ अन् महायुतीसमोर बंडोबांचं टेन्शन; कुठे-कुठे कायम आहे बंडखोरी
Raver Assembly Constituency : रावेरमध्ये चौधरी-जावळेंचे वारसदार भिडणार; वंचित-प्रहारचा फटका कुणाला? VIDEO

श्रीरामपूर विधानसभेत महायुतीत बंडखोरी कायम आहे. भाऊसाहेब कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कांबळे यांची माघार घेतली नाहीये. शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना देण्यात एबी फॉर्म देण्यात आले होते. आज पक्षाकडून कांबळे यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. कांबळेचा अर्ज कायम राहिल्याने महायुतीत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Election: अनेक मतदारसंघात मविआ अन् महायुतीसमोर बंडोबांचं टेन्शन; कुठे-कुठे कायम आहे बंडखोरी
Maharashtra Election : पश्चिम महाराष्ट्रात १३ मतदारसंघात बंड, कोण कोणत्या मतदरसंघात, कुणाला बसणार फटका?

जालन्यात मविआचं टेन्शन वाढलंय. महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झालीय. ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जालन्यातील घनसांवगी मतदारसंघांमधून भाजपचे माजी विधानसभा प्रमुख सतीश घाडगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय.

अहिल्यानगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ निहाय लढती खालीलप्रमाणे

नगर शहर मतदारसंघ

संग्राम जगताप - AP राष्ट्रवादी

अभिषेक कळमकर - SP राष्ट्रवादी

शशिकांत गाडे - अपक्ष - बंड - UBT

सचिन डफळ - मनसे

पारनेर मतदारसंघ

राणी लंके - SP राष्ट्रवादी

काशिनाथ दाते - AP राष्ट्रवादी

अविनाश पवार - मनसे

विजय औटी - अपक्ष - बंड - AP राष्ट्रवादी

संदेश कार्ले - अपक्ष - बंड - UBT सेना

विजय भास्कर औटी - अपक्ष

श्रीगोंदा मतदारसंघ

अनुराधा नागवडे - UBT सेना

विक्रम पाचपुते - BJP

अण्णासाहेब शेलार - वंचित बहुजन आघाडी

संजय शेळके - मनसे -

राहुल जगताप - अपक्ष - बंड - SP राष्ट्रवादी

शेवगाव - पाथर्डी मतदारसंघ

मोनिका राजळे - BJP

प्रताप ढाकणे - SP राष्ट्रवादी

चंद्रशेखर घुले - अपक्ष

हर्षदा काकडे - अपक्ष

किसन चव्हाण - वंचित -

कर्जत - जामखेड मतदारसंघ

रोहित पवार - SP राष्ट्रवादी

राम शिंदे - BJP

रवींद्र कोठारी - मनसे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com