भरत मोहोळकर, साम टीव्ही
रावेर : विधानसभा निवडणूकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू झालीय .. त्यातच उत्तर महाराष्ट्रात दिवंगत हरिभाऊ जावळे यांचा मुलगा अमोल जावळे आणि शिरीष चौधरींचा मुलगा धनंजय चौधरी यांच्या लॉन्चिंगमुळे रावेरकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..वंचित बहुजन आघाडीकडून तृतियपंथीय असलेल्या शमिभा पाटलांची उमेदवारीही चर्चेचा विषय आहे. तर गेल्यावेळी लक्षणीय मतं घेणा-या प्रहारमुळे ही लढत आता चौरंगी झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र धनंजय चौधरी आणि अमोल जावळे या दोघांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
जावळे आणि चौधरींचे वारसदार रिंगणात असल्याचा मुद्दा पुढे करत ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असल्याचा मुद्दा वंचित शमिभा पाटलांनी उपस्थित केलाय. तर प्रहारच्या अनिल चौधरींनी रावेरच्या प्रश्नांवर लढणार असल्याची भूमिका घेतलीय. रावेरमधील पारंपरिक जावळे विरुद्ध चौधरी ही लढत पुढच्या पिढीतही कायम आहे. तर 2019 मध्ये अनिल चौधरींनी भाजपचे दिवंगत आमदार हरिभाऊ जावळेंचा विजयरथ रोखला. नेमकं कसं होतं मतांचं समीकरण? पाहूयात.
2019 मधील मतांचं गणित
शिरीष चौधरी, काँग्रेस, 77 हजार 941 मतं
हरिभाऊ जावळे, भाजप, 62 हजार 332 मतं
अनिल चौधरी, अपक्ष, 44 हजार 841 मतं
15 हजार 609 मतांनी शिरीष चौधरी विजयी
रावेरमध्ये लेवा पाटील, गुजर पाटील, आदिवासी, मराठा आणि मुस्लीम समाज हे जातीय समीकरण महत्वाचं आहे. मात्र महायुती सरकारने 17 जातींचा ओबीसीत समावेश केल्याने त्याचा रावेरमध्ये भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. तर बेरोजगारीचा मुद्दा काँग्रेसने तापवलाय. मात्र प्रहार आणि वंचित कुणाचं गणित बिघडवणार? याकडे लक्ष लागलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.