sangamner vikhe vs thorat political drama sangamner vikhe vs thorat political drama
Maharashtra Assembly Elections

विखे-थोरात वाद टोकाला! संगमनेरमध्ये जाळपोळ, पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या; जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक

Jayashree Thorat News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांचा वाद पुन्हा एकदा टोकाला गेला आहे. संगमनेर येथील सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले.

Namdeo Kumbhar

sangamner vikhe vs thorat political drama : धांदरफळ येथील कार्यकर्ते वसंत देशमुख यांच्याकडून जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. देशमुख यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आळे. शहरात अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळीच्या घटनाही घडल्या. (Ahilyanagar, Congress's Balasaheb Thorat and BJP's Radhakrishna Vikhe Patil engage in a fierce political battle )

सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्यामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण (Maharashtra Assembly Election 2024:) तापले. जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात सुजय विखे यांची सभा झाली होती. या सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. धक्कादायक म्हणाले, सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. वसंतराव देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्याशिवाय संगमनेर पोलीस स्टेशन बाहेरही ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संगमनेरमध्ये काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना घडल्या.

गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. जयश्री थोरात यांच्यासह दुर्गा तांबे देखील ठिय्या आंदोलनात सहभागी होत्या. रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर चारही गुन्हे दाखल झाल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.आज सकाळी 10 वाजता निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

कोण कोणते गुन्हे नोंदवले -

धांदरफळ येथील सभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्यव्या प्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर थोरात समर्थक महिला जाब विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना धक्काबुक्की केल्याचा पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला. घटनेनंतर तालुक्यातील निमोण गावात युवक आणि महिलांना मारहाण प्रकरणी विखे समर्थक सरपंच तसेच काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. निमोण गावात मारहाण झालेल्या मुलाला आणण्यासाठी गेलेल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे, पण... सुजय विखे काय म्हणाले ?

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कारवाई व्हावी. मात्र जाळपोळ करणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली.

वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करणारच होतो. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरु केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मात्र ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. गाड्या जाळणाऱ्यांचे फोटो, व्हिडीओ आमच्याकडे आहेत. मात्र मला वातावरण पेटवायचे नाही. या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. महिलांबद्दल कुणीही अशी टीका करू नये. माझ्या भाषणात मी जयश्री थोरात यांना ताई म्हणूनच संबोधित करतो. मलाही बहीण आहे, माझ्याही घरात महिला आहेत. मात्र कुणीही महिलांबद्दल खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे सुजय विखे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almonds And Walnuts: दिवाळीच्या दिवसात बदाम आणि अक्रोड खाण्याचे ९ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: पुण्यात राहुल गांधी करणार रोड शो

Diwali Skincare : दिवाळीत सुंदर दिसणे पडू शकते महागात; मेकअपमुळे होणाऱ्या स्किन प्रॉब्लेमपासून वाचण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Beed Assembly Election: इकडे विधानसभेची रणधुमाळी, तिकडे बीडमध्ये भाजपला गळती, महायुतीचं टेन्शन वाढलं!

NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच

SCROLL FOR NEXT