Maharashtra Assembly : मविआत बिघाडीची शक्यता, ठाकरेंच्या चारही उमेदवारांचे काम करणार नाही, पवार समर्थक आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कल्याण डोंबिवलीत महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झााले आहेत.
Maharashtra Assembly Election : मविआत वाद?
Maharashtra Assembly Election Tv9
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra Assembly Election 2024: कल्याण पूर्व मतदारसंघात हाय व्होल्टेज राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे महायुतीत तर दुसरीकडे ठाकरे गटाने कल्याण डोंबिवलीतील चारही मतदारसंघात उमेदवार दिल्याने काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच ठाकरे गटाच्या उमेदवाराचं काम करणार नसल्याचा पवित्रा घेतलाय याबाबत उद्या पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करणे नसल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली अंतर्गत कल्याण पूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण व डोंबिवली असे चार विधानसभा मतदारसंघ येतात. यामधील कल्याण पूर्व मतदार संघासह कल्याण पश्चिम मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील या मतदारसंघावर दावा केला होता. शिवसेनेचे उमेदवार या मतदारसंघात तीन वेळा पराभूत झाले असल्याचा स्पष्टीकरण देत या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी दावा केला होता. ठाकरे गटाने आधी कल्याण ग्रामीण मधून सुभाष भोईर, डोंबिवलीमधून दीपेश म्हात्रे, त्यापाठोपाठ कल्याण पूर्व मधून धनंजय बोडारे तर कल्याण पश्चिम मधून सचिन बासरे यांना उमेदवारी जाहीर केली. कल्याण पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Assembly Election : मविआत वाद?
Weather Update : पावसाची माघार, आता गुलाबी थंडीची प्रतीक्षा; राज्यात आज कसं असेल हवामान?

सचिन पोटे हे कल्याण पूर्व मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र हा मतदारसंघ ठाकरे यांच्या वाटेला गेल्याने सचिन पोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय . त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील नाराजी व्यक्त केली. कल्याण पूर्व किंवा कल्याण पश्चिम या दोन मतदारसंघातील एक जागा मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली होती. मात्र या दोन्ही जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शरद पवार गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली या बैठकीत चार मतदारसंघांपैकी एकही जागा न सोडल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत आज शनिवारी आपण पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत, मात्र ठाकरे गटाच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com