Eknath Shinde vs Uddhav Thackeray Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : विधानसभेआधी शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार? ठाकरेंची ताकद वाढणार!

Maharashtra Political News : एकीकडे भाजप काही नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील ठाकरे गटात येण्यात इच्छुक असल्याचं कळतंय.

Satish Daud

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. दोन्ही नेते सध्या पक्षसंघटना बळकट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. एकीकडे भाजप काही नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील ठाकरे गटात येण्यात इच्छुक असल्याचं कळतंय.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागेश वनकळसे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच ठाकरे गट किंवा शरद पवार गटात प्रवेश करणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. नागेश वनकळसे हे शिवसेना शिंदे गटाचे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

मोहोळ विधानसभा मतदारसंघातून नागेश वनकळसे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2019 च्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या पाठिंब्याने येथे यशवंत माने यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि ते निवडून आले.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर यशवंत माने हे अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार पर्यायी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे युतीधर्मामुळे या जागेवरुन उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने शिंदे गटाचे नागेश वनकळसे नाराज झाले आहेत. मी कुठल्याही परिस्थिती आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार, असा निर्धारच वनकळसे यांनी केला आहे.

नागेश वनकळसे यांची मोहोळमध्ये मोठी ताकद आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय पदाधिकारी राहिले आहेत. अभ्युदय मल्टिस्टेट बँकेचे प्रमुख आणि माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी वनकळसे यांच्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी ताकद लावली, त्यामुळे वनकळसे धनुष्यबाण सोडून हाती मशाल किंवा तुतारी घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

SCROLL FOR NEXT