Amravati News : अमरावतीत मध्यरात्री मोठा तणाव, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

Amravati Breaking News : जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर केला असून दगडफेकीत आतापर्यंत २९ पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे.
Amravati Breaking News
Amravati Breaking NewsSaam TV
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती : उत्तर प्रदेशातील गाजियाबाद स्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अमरावती शहरात उमटले. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी करत शुक्रवारी रात्री मोठा जमाव नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर चालून आला. यावेळी पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यावर हल्ला केला.

Amravati Breaking News
PM Modi Thane Visit : PM नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; 56000 कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन, कसा असेल दौरा?

त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. जमावाने पोलीस स्टेशनच्या तोडफोडसह जाळपोळ देखील केल्याची माहिती आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर केला असून दगडफेकीत आतापर्यंत २९ पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. मध्यरात्री १ वाजेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. यती नरसिंह नंद सरस्वती यांनी २९ सप्टेंबर रोजी गाजियाबाद येथे बोलत असताना विशिष्ट धर्मीयांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा या मागमीसाठी अंदाजे ४०० ते ५०० लोकांचा एक मोठा जमाव शुक्रवारी रात्री नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनवर चालून गेला. पोलिसांनी या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहींनी बाचाबाची सुरु करत पोलीस ठाण्याची तोडफोड सुरु केली.

त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर अश्रुदुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. पण जमाव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांवर दगड आणि विटांचा मारा सुरु केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. आतापर्यंत या घटनेत २९ पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Amravati Breaking News
Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com