Jamner Constituency SaamTv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll : जामनेरमध्ये भाजपचं पारडं जड, गिरीश महाजन पुन्हा होणार आमदार? पाहा VIDEO

Jamner Assembly Constituency News, Maharashtra Exit Poll : सकाळच्या एक्झिट पोलनुसार जामनेर विधानसभा मतदार संघात भाजपच पारड जड असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी गिरीश महाजन यांना मतदारांनी पुन्हा पसंती दिली असून टेक इथले संभाव्य आमदार असल्याचं एक्झिट पोलमधून समोर आलं आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. दिलीप महाजन यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप खोडपे हेच त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र तरीही सकाळच्या एक्झिट पोलमधून भाजपचे विद्यमान आमदार गिरीश महाजन यांचं पारडच इथे जड असलेलं बघायला मिळत आहे. त्यामुळे संभाव्य आमदार म्हणून गिरीश महाजन हे पुन्हा एकदा जामनेरमध्ये सरशी करताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जामनेरमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर खोडपे यांनी महाजन यांना तगड आव्हान दिलं होतं. मात्र गिरीश महाजन यांना जामनेरच्या जनतेने कौल असल्याने ते पुन्हा एकदा आपला गड राखताना दिसत आहेत. महाजन या मतदारसंघातून वर्षानुवर्ष आमदार आहेत. राज्यात मंत्रिपद देखील त्यांनी भूषवलं आहे. आता 2024मध्ये देखी टेक संभाव्य आमदार असतील असं दिसत आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांचा विजय झाला तर त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. जामनेरमध्ये काल मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागात देखील मतदानासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्या आहेत. जामनेरमध्ये 70.54 एकूण मतदान झालं आहे. याठिकाणी 3 लाख 35 हजार 274 इतके मतदार आहेत. 2 लाख 36 हजार 534 मतदारांनी उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद केलं आहे. आता नेमकी बाजू कोण मारणार हे 23 तारखेलाच समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT