Kokan Ganeshotsav : गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून, मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; कोकणवासीयांसमोर विघ्न कायम

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवाच्या तोंडावरही मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती बिकटच आहे. १८ वर्षांनंतरही अधूरा असलेला रस्ता, खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या भक्तांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Mumbai Goa highway
Kokan GaneshotsavSaam tv
Published On
Summary
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भक्तांची संख्या वाढते.

  • मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे संकट कायम आहे.

  • १८ वर्षांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण आहे.

  • सरकारची आश्वासने हवेत विरतात; जनतेला त्रासाचा सामना करावा लागतो.

गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. त्यासाठी कोकणवासियांची लगबग सुरु झाली आहे. विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी कोकणवासीयांची आतुरता वाढत असताना, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे गणेशभक्तांच्या प्रवासात अडथळे निर्माण होणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढते. मात्र, महामार्गावरील अत्यंत खराब स्थितीमुळे भक्तांच्या आस्थेच्या प्रवासात 'विघ्न' कायमच राहते.

Mumbai Goa highway
Mumbai Ganeshotsav : मुंबई गणेशोत्सव मंडळांना महापालिकेचा मोठा झटका, खड्डा खोदल्यास १५ हजार रुपये दंड | VIDEO

रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवर अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे असून, अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे हा प्रवास अधिकच धोकादायक झाला आहे. विशेष म्हणजे, या महामार्गाच्या कामास तब्बल १८ वर्षे झाली असूनही ते पूर्ण झालेले नाही. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर मंत्री आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याची पाहणी करतात, आश्वासनांची मालिका सुरू होते; मात्र प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही.

Mumbai Goa highway
Ganeshotsav Festival : गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची घोषणा | VIDEO

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जनआक्रोश समितीने माणगाव येथे सहा दिवस उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी रस्त्याच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर सत्तांतर घडले आणि महामार्गाच्या कामाची परिस्थिती पूर्ववतच राहिली. त्यामुळे यंदाही गणेशभक्तांना कोकणच्या दिशेने प्रवास करताना खड्डे, वाहतूक कोंडी आणि असुविधांचा सामना करावा लागणार आहे.

Q

मुंबई-गोवा महामार्गाची सध्याची स्थिती कशी आहे?

प्रश्न 3: गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या अडचणी येतात?
उत्तर: वाहनांची संख्या वाढते, रस्त्यावर खड्डे असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतो.

प्रश्न 4: सरकारकडून कोणती पावले उचलली गेली आहेत?
उत्तर: दरवर्षी मंत्री पाहणी करतात व आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद आहे.

A

महामार्गावर अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे असून रस्त्याचे काम अपूर्ण आहे, त्यामुळे प्रवास धोकादायक ठरतो आहे.

Q

हा रस्ता किती वर्षांपासून अपूर्ण आहे?

A

तब्बल १८ वर्षांपासून हा महामार्ग पूर्ण होण्याची प्रतीक्षा सुरू आहे.

Q

गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या अडचणी येतात?

A

वाहनांची संख्या वाढते, रस्त्यावर खड्डे असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतो.

Q

सरकारकडून कोणती पावले उचलली गेली आहेत?

A

दरवर्षी मंत्री पाहणी करतात व आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com