Girish Mahajan : खोट्या नरेटीव्हला जनता बळी पडणार नाही; नाव न घेता गिरीश महाजनांची संजय राऊतांवर टीका

Girish Mahajan Criticism on Sanjay Raut : संजय राऊत यांच्या खोट्या नरेटीव्हला आता जनता बळी पडणार नाही, असंही महाजनांनी ठामपणे सांगितलं आहे.
संजय राऊत यांच्या खोट्या नरेटीव्हला आता जनता बळी पडणार नाही, असंही महाजनांनी ठामपणे सांगितलं आहे.
Girish Mahajan Sanjay RautSaam tv
Published On

आता त्यांना घरीच बसण्याची वेळ येणारं आहे आणि सकाळी उठून पोपटपंची सारखं बोलण्याची वेळ येणार आहे, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता संजय राऊत यांना पुन्हा टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्या खोट्या नरेटीव्हला आता जनता बळी पडणार नाही, असंही महाजनांनी ठामपणे सांगितलं आहे.

संजय राऊत यांच्या खोट्या नरेटीव्हला आता जनता बळी पडणार नाही, असंही महाजनांनी ठामपणे सांगितलं आहे.
Maharashtra Assembly Election : शिंदेसेनेच्या संजय शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे कुणाला उतरवणार? मतदारसंघाचे गणित समजून घ्या!

महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी ठासून सांगत आहे, असं संजय राऊत म्हणाजे होते. त्यावर प्रत्युत्तर देताना महाजनांनी नाव घेता राऊतांवर टीका केली आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. अशात दररोज विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत. तसेच सत्ताधारी देखील विरोधकांवर आरोपांच्या आणि टिकेच्या फैरी झाडत आहेत. त्यात आता मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर टिकास्त्र डागलं आहे.

राज्यातून उत्तर महाराष्ट्रच महायुतीला सर्वात जास्त जागा देणार आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होणार असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

भाजपाचे धुळे शहराचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन धूळ्यात उपस्थित आहेत. महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. भव्य शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

संजय राऊत यांच्या खोट्या नरेटीव्हला आता जनता बळी पडणार नाही, असंही महाजनांनी ठामपणे सांगितलं आहे.
Assembly Election: एकाच घरात दोन पक्ष !; कुठे पिता-पुत्र, तर कुठे काका-पुतण्यामध्ये लढत, कोण मारणार बाजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com