Pune Crime: पिंपरीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न, गलेलठ्ठ पैशांचं आमिष, अमेरिकन नागरिकाला अटक

Forced Religious conversion in Pimpri: जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रयत्न करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यात एका अमेरिकन नागरिकाचाही समावेश आहे.
Forced Religious conversion in Pimpri
Forced Religious conversion in PimpriSaam Tv News
Published On
Summary
  • जबरदस्तीने धर्म परिवर्तनासाठी दडपण टाकल्याचा आरोप.

  • अमेरिकन नागरिकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

  • धार्मिक भावना दुखावल्याने पोलिसांत तक्रार दाखल.

  • आरोपींकडून मोबाईल जप्त, तपास सुरु.

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जबरदस्तीनं धर्म परिवर्तन प्रयत्न करत हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी एका अमेरिकन नागरिकासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींना अटकही करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक अल्पवयीन मुलगाही या प्रकरणात सहभागी असल्याची माहिती आहे.

सनी बन्सीलाल दनानी (वय २७) असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. तो पिंपरी कॅम्प येथील वैष्णोदेवी मंदिराजवळ राहत असल्याची माहिती आहे. त्याच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकण्यात येत होता. "तुम्ही येशूला देव म्हणून स्विकाराल तर सुख, शांती, संपत्ती आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल. इतर सर्व देव-धर्म केवळ कथा आहेत," असे म्हणत त्यांच्यावर मानसिक आणले.

Forced Religious conversion in Pimpri
एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचा आरोप, निखिलसोबत त्यावेळी काय झालं होतं? रोहिणी खडसेंनी सगळंच सांगितलं

शिवाय धर्म बदलल्यास भविष्यात आर्थिक मदत करू, असे आमिष दाखवून त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान करण्यात आला. या प्रकरणी तक्रारदारानं पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी करून तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेतली. तसेच कारवाईला सुरूवात केली.

पिंपरी पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, Schaefer Javin Jacob (वय ४१, मूळ राहणार – कॅलिफोर्निया, अमेरिका, सध्या – मुकाई चौकाजवळ, पुणे) स्टीव्हन विजय कदम (वय ४६, राहणार – उद्यमनगर, अजमेरा, पिंपरी, पुणे) आणि विधी संघर्षित बालकाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले आहे. इतर दोघांना ताब्यात घेतले आहे.

Forced Religious conversion in Pimpri
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३(५) आणि विदेशी नागरिक कायदा कलम १४ (ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासात आरोपींकडून दोन मोबाईल जप्त केले आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com