Kasaba Peth Assembly Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Kasaba Peth Assembly Constituency: कसबा पेठमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप सामना रंगणार, कोण मारणार बाजी?

Priya More

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा पुणे शहरातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.जुन्या पुणे शहरातला महत्त्वाचा भाग या मतदारसंघात येतो. या मतदारसंघामध्ये पुणे शहरातील कसबा पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ या भागांचा समावेश होतो. कसबा पेठ मतदारसंघ हा १९९५ सालापासून भाजपचा बालेकिल्ला होता. पण २०२३ च्या पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला.

कसबा पेठ मतदारसंघामध्ये १९९५ सालापासून भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट हे आमदार म्हणून निवडून येत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने गिरीश बापट यांना उतरवले. त्यानंतर ते खासदार झाले. अशामध्ये कसबा पेठ मतदारसंघातून भाजपने पुण्याच्या त्यावेळीच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. मुक्ता टिळक या आमदार झाल्या. पण डिसेंबर २०२२ मध्ये त्याचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार झाले.

सध्याची राजकीय स्थिती?

कसबा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक इच्छुक आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी निवडणूक लढवण्याबाबतची इच्छा बोलून दाखवली. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा करण्यात आल्या होत्या. पण आता आगामी निवडणुकीत भाजप कसबामध्ये कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस या मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर यांनाच पुन्हा संधी देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

२०२३ ची विधानसभा पोटनिवडणूक -

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. काँग्रेसच्या रवीद्र धंगेकर विरूद्ध भाजपच्या हेमंत नारायण रासने यांच्यामध्ये लढत झाली. या पोट निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली. धंगेकर ७३,३०९ मतं मिळवत विजयी झाले. त्यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला. रासने यांना ६२,३९४ मतं मिळाली होती.

२०१९ ची विधानसभा निवडणूक -

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक आणि काँग्रेस उमेदवार अरविंद शिंदे यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये भाजपला सत्ता मिळवण्यात यश आले होते. या निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक ७५,४९२ मतांनी विजयी झाल्या होत्या. तर काँग्रेस उमेदवार अरविंद शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यांना ४७,२९६ मतं मिळाली होती.

२०१४ ची विधानसभा निवडणूक -

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस उमेदवार रोहित टिळक यांच्यात निवडणुकीचा सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले होते. गिरीश बापट ७३,५९४ मतांनी विजयी झाले होते. तर काँग्रेस उमेदवार रोहित टिळक यांचा पराभव झाला होता. त्यांना ३१,३२२ मतं मिळाली होती.

२००९ ची विधानसभा निवडणूक -

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार गिरीश बापट आणि मनसे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती. या मतदारसंघामध्ये गिरीश बापट विजयी झाले होते. गिरीश बापट ५४,९८२ मतांनी विजयी झाले होते. तर मनसे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला होता. त्यांना ४६,८२० मतं मिळाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT