Maharashtra Assembly Elections

Assembly Election: हरियाणातील पराभवानंतर महाराष्ट्रासाठी काँग्रेसची नवी प्लानिग; विधानसभा निवडणुकीची आखली रणनीती

Maharahstra Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभेसाठी कंबर कसलीय. येथील निवडणुकीच्या तयारीसाठी रणनीती आखलीय.

Bharat Jadhav

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या ईर्षेने पेटलेली काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलीय. हरियाणामध्ये झालेल्या चुका परत महाराष्ट्र विधानसभेत होऊ नये, यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात विजय आपलाच व्हावा यासाठी रणनीती आखत आहे.

काँग्रेसने पक्षांतर्गत वाद महाराष्ट्रातील त्यांचा मुख्य वर्ग समर्थकांसह लहान वर्ग आणि जाती आणि लहान पक्षांच्या संभाव्य परिणामाची जाणीव ठेवून रणनीती बनवत आहे. तसेच नेत्यांना विधानं करताना काळजी घेण्याच्या सुचना दिल्यात. हरियाणात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ यश आलंय. भाजपच्या यशानंतर निर्माण झालेल्या वातावरणामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये काहीसा आत्मविश्वास कमी झालाय. दरम्यान हरियाणामध्ये काँग्रेसला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली पण जागा वाढल्या नाहीत.

हरियाणात एका मोठ्या वर्गाला म्हणजेच जाट समूहाकडे अधिक लक्ष दिलं परंतु जाणते किंवा अजाणतेपणे इतर वर्गांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यात छोट्या पक्षांनी काँग्रेसच्या विजयाची आशा धुसर केली. दरम्यान महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. यात जातीय समीकरणही प्रदेशानुसार बदलते. हे पाहता पक्षाने महाराष्ट्रातील सपा, बसपासह स्थानिक छोट्या पक्षांच्या स्थितीचेही आकलन सुरू केले आहे. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष या प्रादेशिक पक्षांच्या ताकदीचा अंदाज घेणं सुरू केलंय.

दरम्यान हरियाणामध्ये ईव्हीएममुळे पराभव आला असा आरोप, काँग्रेसकडून केला जात आहे. पराभवाला कारणीभूत ठरलेल्या धोरणात्मक चुकाही मान्य करत आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने पक्षाच्या रणनीतीत त्रुटी असल्याचे मान्य केलयं. नेत्यांमधील वाद हा एक मुद्दाही पराभवाचं कारण होतं. परंतु पक्ष लहान जाती गट आणि अपक्ष उमेदवारांवर लक्ष केंद्रित करण्यात अपयशी ठरल्याची माहिती एका काँग्रेस नेत्याने दिलीय.

इतकेच नाही तर 'इंडिया' आघाडीतील समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षासोबतची युतीही गांभीर्याने घेतली गेली नाही. यादवबहुल भागात समाजवादी पक्षाच्या दीपेंद्र हुड्डा यांच्या विधानानेही पक्षाच्या मतांवर हानी पोहोचली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही विषयावर विधाने करताना किंवा मत व्यक्त करताना सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांनी सावध राहण्याचा सल्ला काँग्रेस हायकमांडने दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT