Jamner Assembly Constituency Saam tv
Maharashtra Assembly Elections

Jamner Assembly Constituency : जळगावच्या जामनेरमध्ये कोण सत्ता गाजवणार? मंत्री गिरीश महाजन यांना कोण आव्हान देणार?

jalgaon Jamner Assembly Constituency : जळगावच्या जामनेरमध्ये कोणाचा डंका वाजणार,याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांना कोण आव्हान देणार, हे पाहावे लागणार आहे.

Vishal Gangurde

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये रंगू लागली आहे. राजकीय नेत्यांकडून विविध जागांवरही दावे केले जात आहे. जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघातील जामनेर विधानसभा मतदारसंघही जोरदार चर्चेत आहे. जामनेरमधील या जागेवर भाजपने तब्बल पाच वेळा विजयी झेंडा रोवला आहे. सध्या मंत्री गिरीश महाजन या मतदारसंघाचं विधीमंडळात प्रतिनिधित्व करतात.

जामनेर विधानसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग हा ग्रामीण भागात मोडतो. मागील निवडणुकीच्या माहितीनुसार, मतदारसंघातील एकूण २,७८,३५६ मतदार आहेत. तर एकूण ३,४९,९५७ लोकसंख्या मतदारसंघात आहे.

काय आहे जामनेर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास?

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन हे १,१४,७१४ मते मिळवून विजयी झाले. गिरीश महाजन यांनी ३५,०१४ मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरुड यांचा पराभव केला.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी ३५,७६८ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केशव दिंगबर पाटील यांचा पराभव केला. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी १,०३,४९८ मते मिळवली होती. तर केशव पाटील यांना ६७,७३० मते मिळाली होती. मागील दोन दशके या विधानसभा मतदारसंघात भाजपची सत्ता आहे.

९६२ सालांपासून या विधानसभा मतदारसंघात ५ वेळा भाजपने बाजी मारली आहे. तर ४ वेळा काँग्रेस जिंकली आहे. तर दोन वेळा अपक्ष उमेदवार जिंकला आहे.

यंदा कोणाला संधी मिळणार?

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यात जळगावच्या जामनेरमध्ये पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांना भाजपकडून तिकीट मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तसेच भाजपच्या बालेकिल्यात महाविकास आघाडीकडून कोणता पक्ष उमेदवार उभा करणार याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

SCROLL FOR NEXT