Dombivli politics  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Dombivli Politics : भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार का? रविंद्र चव्हाणांना मविआ,मनसेतून कोण आव्हान देणार?

dombivli assembly constituency : भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरु केली आहे. डोंबिवलीत रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे.

Vishal Gangurde

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली मतदारसंघात महायुतीतच चढाओढ पाहायला मिळत आहे. महायुतीतील शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केल्याने भाजप आक्रमक झाला आहे. दुसरीकडे या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि मनसेने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

डोंबिवली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात भाजप सलग तीन वेळा जिंकली आहे. या मतदारसंघावर मंत्री रविंद्र चव्हाण यांची मजबूत पकड असल्याचं बोललं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील रस्ते आणि फेरीवाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे.आगामी विधानसभा निवडणुकीमुळे दररोजच नव्या-नव्या आरोपांना प्रत्युत्तर आमदार रविंद्र चव्हाण यांना द्यावे लागत आहे. या मतदारसंघावर दावा करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. विरोधकही या मतदारसंघातील प्रश्न उचलून धरत आहेत.

सलग तीन वेळा भाजप विजयी

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी मनसेच्या मंदार हळबे यांचा पराभव केला होता. २०१९ झालेल्या विधानसभा निडवणुकीत ४१,३११ मतांनी रविंद्र चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडवणुकीत रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. त्यावेळी रविंद्र चव्हाण तब्बल ४६,२२५ मतांनी विजयी झाले होते.

कोणाला मिळणार उमेदवारी?

डोंबिवली मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजप नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांच्यासमोर यंदा ठाकरे गटाचे आवाहन असण्याची शक्यता आहे . लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार वैशाली दरेकर पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी डोंबिवलीमधून इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत.

तर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डोंबिवलीमधून मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि पदाधिकरी प्रल्हाद म्हात्रे इच्छुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT