Kalyan Politics : दोघांच्या भांडणात होणार तिसऱ्याचा लाभ? कल्याण पूर्व मतदारसंघासाठी महायुतीत चढाओढ, महाविकास आघाडीचीही मोठी फिल्डिंग

kalyan east constituency Election : कल्याण पूर्व मतदारसंघासाठी महायुतीत चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीनेही या मतदारसंघासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे.
दोघांच्या भांडणात होणार तिसऱ्याचा लाभ? कल्याण पूर्व मतदारसंघासाठी महायुतीत चढाओढ, महाविकास आघाडीचीही मोठी फिल्डिंग
Kalyan Politics :Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण पेटलं आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीमुळे पक्षातील तिकीटासाठी इच्छुक उमेदवारांचा ओढा वाढू लागला आहे. तर या मतदारसंघात महायुतीतच अंतर्गत उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार देखील तिकीटावर दावा करु लागले आहेत. मनसेनेही या मतदारसंघात चाचपणी सुरु केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महिन्याभरानंतरच येथील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गणपत गायकवाड यांचा तीन वेळा एक हाती विजय

कल्याण पूर्व मतदारसंघात आमदार गणपत गायकवाड हे तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. २००९ साली पहिल्यांदा शिवसेनेचा उमेदवाराला पराभूत करत गणपत गायकवाड अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये गायकवाड हे पुन्हा भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून दुसऱ्यांदा अपक्ष निवडून आले. पुढे त्यांनी भाजपला समर्थन दिलं. २०१९ मध्ये भाजपकडून उमेदवारी मिळवत गणपत गायकवाड हे तिसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाले. २०१९ साली आमदार गायकवाड यांच्यासमोर बंडखोर धनंजय बोडारे यांचं आवाहन होतं. बोडारे यांचा पराभव करून गणपत गायकवाड यांनी हॅट्रिक साधली.

दोघांच्या भांडणात होणार तिसऱ्याचा लाभ? कल्याण पूर्व मतदारसंघासाठी महायुतीत चढाओढ, महाविकास आघाडीचीही मोठी फिल्डिंग
kalyan Politics : कल्याण पश्चिमवरून महायुतीतच रस्सीखेच; महाविकास आघाडीसह मनसेचीही फिल्डिंग, अब की बार... कोण जिंकणार?

२०२९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडू लागले होते. पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातील वाद विकोपाला गेला. याच वादातूनच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या घटनेने कल्याणमधील राजकारण ढवळून निघालं होता. सध्या आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत. आता या मतदारसंघातवर शिंदे गटाने दावा केला आहे.

शिंदे गटाकडून निलेश शिंदे , महेश गायकवाड, विशाल पावशे, नवीन गवळी यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे भाजपने मतदारसंघ सोडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील मतदारसंघातील राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. भाजपने त्यांना विधानसभा प्रमुखाची जबाबदारी दिली आहे. याचबरोबर भाजप फुलबाग गायकवाड यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.

फुलबाग यांच्या नावाची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. भाजपने उमेदवारी न दिल्यास सुलभा गायकवाड या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. हा मतदारसंघ भाजपच्या पदरात पडल्यास शिंदे गटात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकंदरीत या मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दोघांच्या भांडणात होणार तिसऱ्याचा लाभ? कल्याण पूर्व मतदारसंघासाठी महायुतीत चढाओढ, महाविकास आघाडीचीही मोठी फिल्डिंग
Kalyan Politics : ठाण्यात आमनेसामने अन् कल्याणमध्ये एकमत; मनसे आणि ठाकरे गटाचा सफाई कामगारांच्या मागणीला पाठिंबा

महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे हे तीन नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे या मतदारसंघात इच्छुक आहेत. पोटे यांनी या मतदारसंघासाठी वरिष्ठांकडे विचारणा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कोणाच्या वाटाल्या जातो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com