Chhagan Bhujbal  Google
Maharashtra Assembly Elections

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो', पुस्तक बॉम्बमुळे महायुतीची कोंडी

Chhagan Bhujbal News: एकीकडे विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Girish Nikam

विधानसभेची रणधुमाळी शिगेला पोहचलेली असताना भुजबळांच्या एका पुस्तकातल्या मुलाखतीमुळे मोठा बॉम्ब पडलाय. इडीपासून मुक्ती हवी होती म्हणून भाजपसोबत गेल्याचा दावा या मुलाखतीत भुजबळांनी केलाय. त्यामुळे प्रचार जोमात असताना महायुतीला घेरण्याची आयती संधी मविआला मिळालीय...नेमकं काय म्हटले भुजबळ आणि काय आहे ईडीची गडबड .याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

'ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो', भुजबळांच्या कथित मुलाखतीनं खळबळ

महायुतीत अजित पवार आणि शिंदे गटातील धुसफूस लपून राहिली नाही. अजित पवारांवर आणि अर्थखात्यावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून टिका टिप्पणी होत असते. अशा स्थितीतच आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत छगन भुजबळांच्या खळबळजनक दाव्यानं राजकीय वातावरण आणखीनच तापलंय. ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो, असा मोठा दावा छगन भुजबळांनी केलाय. राजदीप सरदेसाईंच्या 2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात त्यांनी मुलाखत दिल्याचं समोर आलंय. मात्र या पुस्तकातल्य़ा मुलाखतीतला छापून आलेला मजकूर भुजबळांनी फेटाळून लावलाय. आपण विकासासाठी भाजपसोबत गेल्याचं स्पष्टीकरण दिलंय.

छगन भुजबळांनी राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात काय दावा केलाय पाहूयात...

ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो. ईडीपासून सुटका झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. माझ्यासाठी ईडीपासून सुटका म्हणजे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्यानं केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना होती.पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे हा विषय मांडला होता.शरद पवारांना हे सारं समजत होतं. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. .अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणीचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्यानं ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली.

या पुस्तकातील दाव्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकातील माहिती सत्य असल्याचं माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. तर ईडीचा दबाव हेच पक्षफुटीचं कारण असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

नेत्यांच्या प्रतिक्रिया

ईडीचा ताप नको, शांत झोप लागावी म्हणून भाजपात गेल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी म्हटलं होतं. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी ईडीच्या धाकानं पक्षांतर केल्याचं सा-या राज्यानं पाहिलंय. सरदेसाईंच्या पुस्तकातील दाव्यानं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महायुतीची कोंडी झाली असली तरी याचा निकालावर काही परिणाम होणार का याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT