Maharashtra Assembly Elections

Assembly Result : काही तरी मोठी गडबड आहे, महाराष्ट्राच्या सध्याच्या निकालावर ठाकरे गटाच्या नेत्याला शंका

Maharashtra Vidhansabha Result 2024: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत असून यात महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत निकालाबाबत मोठं विधान केलंय.

Bharat Jadhav

हा जनतेचा कौल नाही, हा अदानी आणि पैशांचा कौल , यात काही तरी गडबड आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा झाला नाही. पैशाचा वापर झालाय. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे निवडणून येऊ शकतात. अजित पवार यांच्याविरोधात जनतेत रोष आहे. तर शरद पवार यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होती, ते वादळ कोणी का पाहत नाही असा सवाल ही संजय राऊत यांनी केलाय. विधानसभेच्या निकाल मोठं कारस्थान आहे, हा जनतेचा निकाल नसल्याचं राऊत म्हणाले.

राज्यात २० तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं . आज मतांची मोजणी केली जात आहे. यात महायुतीला मोठं यश मिळाले आहे. यात भाजप १२६ , शिंदे गट ५५, अजित पवार राष्ट्रवादी ३५ अशा जागा जिंकल्या आहेत. मविआचा या निवडणुकीत मोठा पराभव झालाय. मात्र संजय राऊत यांनी या निकालात मोठी गडबड झालीय. हा निकाल ठरवून लावण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

निकालात कुछ तो गडबड है, असं काय फडणवीस, मोदी शाह आणि शिंदेंनी दिवे लावलेत? लोकशाहीत जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करू, पण हा जनतेचा निकाल असूच शकत नाही. हार जीत होत असते, पण हे लावून घेतलेले निकाल आहेत. मी यावर विश्वास ठेवत नसल्याचं संजय राऊत म्हणाले. दरम्यान हा लाडकी बहीण योजनेचा विजय नाही. येथे लाडके दादा, लाडकी आजोबा नाहीत का? असा सवालही राऊ यांनी केलाय.

हा निकाल मोदी,शहा आणि अदानी यांनी ठरवून निकाल लावलाय. अदानींचं राज्यावर बारीक लक्ष होत, कारण त्यांच्या पैशाच्या रूपातून ही सर्व ताकद लावली होती. एकनाथ शिंदे यांचे सगळे आमदार कसे निवडून येतील? त्यांच्याविरोधात जो रोष होता तो कुठे गेला? तर अजित पवार यांच्याविरोधातही नागरिकांच्या मनात रोष होता तर तो कोठे गेला. शरद पवार यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. ते वादळ कसं काय विसरता येईल, असा सवालही राऊत यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shepu Batata Bhaji Recipe: पौष्टिक शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

प्रचारादरम्यान भाजपचा पैशांचा पाऊस, शिंदे गटाच्या नेत्यांनी रांगेहाथ पकडले, निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update : लातूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप पदाधिकारी आणि काँग्रेस उमेदवारामध्ये राडा

Pune Police: पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर

Chanakya Niti: कर्ज घेण्यापूर्वी चाणक्यांचे हे 3 नियम जाणून घ्या; वाद आणि आर्थिक संकट टळेल

SCROLL FOR NEXT