Yogi Adityanath Saam Digital
लोकसभा २०२४

Yogi Adityanath : ते लोकांना विचारतात, भाजप ४०० चा आकडा कसा गाठणार? योगी आदित्यनाथ यांनी काढला विरोधकांना चिमटा

Sandeep Gawade

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांची चांदौली येथे जाहीर सभा झाली. ते म्हणाले की, ४०० पारची घोषणा ऐकूनच समाजवादी पक्षाचे नेते चारीमुंड्या चीत होतात. त्यांना माहीत आहे की निवडणूक लढण्यात काहीच अर्थ नाही. ते लोकांना विचारतात की भाजप ४०० पारचा आकडा कसा गाठणार? लोक त्यांना उत्तर देतात. ज्यांनी रामाला आणलं, त्यांना आम्ही आणू, दिल्लीच्या सिंहासनावर रामभक्तच राज्य करणार, असं लोक सांगत असल्याचं योगी म्हणाले.

समाजवादी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की त्यांच्याकडे लोकसभा निवडणूक लढण्याचं कोणतंही ध्येय नाही. केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी २७३ जागांची आवश्यकता असते आणि समाजवादी पक्ष केवल ६०-६२ जागांवर निवडणूक लढवत आहे.

समाजवादी पक्ष नेहमी रामविरोधी राहिला आहे. ज्याने रामाला अयोध्येत पुन्हा आणलं तो रामभक्तच पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसणार आहे. विरोधक म्हणतात भाजप ४०० पार जागा कशा मिळवणार पण जनता म्हणते ज्याने रामाला आणलं तोच दिल्लीतून राज्यकारभार चालवणार आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

विरोध विकास विरोधी आहेत. माफीया राजला प्रोत्साहन देणारे आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा संपूर्ण जगात सन्मान केला जातो. कॉंग्रेस सरकारच्या काळात तो मिळत नव्हता. नरेंद्र मोदींनी मात्र ते शक्य करून दाखवलं. देशाच्या सीमांवरून आता कोणी घुसखोरी करत नाही. दहशतवादी हल्लो होत नाहीत. नक्षलवाद कमी झाल्याचा दावा आदित्यनाथ यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT