PM Modi Bihar Sabha: इंडिया आघाडीचे लोक ४ जूनला काय करतील? पंतप्रधान मोदींनी चिमटा काढला

Lok Sabha 2024: लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी पीएम मोदी आज बिहारमध्ये आहे. तेथे जनतेला संबोधित त्यांनी राजद आणि कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
पीएम मोदी
PM Modi Saam Tv
Published On

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. बिहारमधील करकट येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील जनतेने काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इंडिया आघाडीला नाकारलं आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही, त्यांच्याकडे फक्त गोंधळ आहे. राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसला त्यांची व्होट बॅंक भरण्यासाठी धर्मावर आधारित आरक्षण द्यायचं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

४ जूनच्या संध्याकाळपर्यंत राजदवाले म्हणतील की, काँग्रेसने आपल्याला बुडवलं आहे. इंडिया आघाडीचे लोकं ४ जूनला एकमेकांचे कपडे फाडतील. पराभवाचं खापर मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर फोडल्यानंतर काँग्रेसचं राजघराणे परदेशात सुट्टीवर जाणार आहे. बिचाऱ्या खर्गेंना कार्यकर्त्यांचा रोष सहन करावा लागेल. काँग्रेस, आरजेडी (RJD And Congress) आणि इंडिया आघाडीला देशाने वारंवार नाकारलं असल्याची टीका मोदींनी केली आहे. करकट लोकसभा मतदारसंघात भाजपने आयोजित केलेल्या सभेत बोलताना पीएम मोदींनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2014) शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा पाटणा येथील बिक्रम येथे झाली. त्यात त्यांनी पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामकृपाल यादव यांच्या समर्थनार्थ आज प्रचार केला आहे. जनतेला संबोधित पंतप्रधान मोदींनी जनतेला ४ जून रोजी लाडू तयार ठेवण्यास सांगितलं (Narendra Modi Bihar Sabha) आहे.

पीएम मोदी
Lok Sabha Election 2024 : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; सोनिया, राहुल गांधींचं मतदान काँग्रेसला नाहीच!

करकटच्या देहरीमध्ये उपेंद्र कुशवाह यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेताना पंतप्रधान म्हणाले की, ४ जून रोजी राजद आणि काँग्रेसचे लोक पराभवाचा आरोप एकमेकांवर करतील. पीएम मोदींची (PM Modi) शेवटची सभा बक्सरच्या अहिरौली येथे होणार आहे. येथे ते भाजप उमेदवार मिथिलेश तिवारी यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा हा नववा बिहार दौरा आहे. पीएम मोदींनी करकटमधून उपेंद्र कुशवाह, सासाराममधून शिवेश राम, अराहमधून आरके सिंह यांच्या समर्थनार्थ मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

पीएम मोदी
Lok Sabha Election 2024: दिल्लीत वातावरण तापलं; मतदानाच्या धामधुमीत 'आप'चे उपराज्यपालांवर गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com