Rahul Gandhi  Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Gandhi: इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? राहुल गांधींनी दिलं उत्तर

India Alliance News: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यादरम्यान विरोधी पक्षांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

Rahul Gandhi News :

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सगळेच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. यातच विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणारा? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याचेच आता स्वतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यादरम्यान विरोधी पक्षांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणले की, ''इंडिया आघाडीने ठरवले आहे की, आम्ही विचारधारेच्या आधारावर निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल.''  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, ही निष्पक्ष नाही तर फिक्स मॅच आहे. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे लोकांनी समजून घेणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, ही निवडणूक संविधान आणि लोकशाही नष्ट करू पाहणारे आणि त्यांचे संरक्षण करू पाहणारे यांच्यातील आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी म्हणाले की, ''प्रसारमाध्यमांद्वारे जे वृत्त दिले जात आहे, त्यापेक्षा ही लढत खूप जवळची आहे. आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. 2004 साली ज्याप्रमाणे 'इंडिया शायनिंग'चा प्रचार करण्यात आला होता, तसाच प्रचार आताही केला जात आहे, पण ती निवडणूक कोणी जिंकली हे लक्षात ठेवा.''

दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी जातनिहाय जनगणना करणे, आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त करणे, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी देणे आणि नवीन शैक्षणिक धोरणात सुधारणा करणे यासह अनेक आश्वासने दिली आहेत. पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला 'न्याय पत्र' असे नाव दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT