uttam jankar criticises opposition on dhairyasheel patil mohite candidate in madha constituency  Saam Digital
लोकसभा २०२४

Uttam Jankar: जेल फोडून मोहितेंची विजयी मिरवणूक काढणार; उत्तम जानकरांच्या वक्तव्याने खळबळ

Uttam jankar Latest Marathi News : उत्तम जानकर - धैर्यशिल मोहिते पाटील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहेत. त्यांची शुक्रवारी एकत्रित सभा झाली.

भारत नागणे

Madha Lok Sabha Election :

माढा लाेकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विराेधक ही निवडणुक जिंकण्यासाठी माेट बांधू लागले आहेत. महायुतीमधील नेते उत्तम जानकर (uttam jankar) हे शरद पवार गटात (sharad pawar faction) सामील झाले. जानकरांनी शुक्रवारी वेळापूर येथील सभेत राजकीय द्वेषातून धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांच्यावर 302 ‌कलमा नव्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे सभेत एकच खळबळ उडाली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

उत्तम जानकर म्हणाले कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढणार म्हटल्यावर त्यांच्यावर जूने प्रकरण काढून कायदेशिर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

धैर्यशील मोहिते पाटील जरी जेल मध्ये गेले तरी सहा तालुक्यातील रणमैदान गाजवून तीन लाख मतांच्या फरकाने त्यांना निवडून आणू. निकालाच्या दिवशी त्यांना बेल मिळाला नाही तर जेल‌ फोडून त्यांच्या विजयाची आपण मिरवणूक काढू असं वतक्य जानकर यांनी केले आहे.

तलाठ्याच्या थोबाडीत मारली, पाटकर्याला पाण्यात बुडवलं : उत्तम जानकर

मी काय गुनी बाळ नव्हतो, दिसला तलाठी की मार थोबाडीत...दिसला पाटकरी की बुडव पाण्यात असा माझा धंदा होता. त्यामुळे माझावरही मोहिते पाटील यांनी 27 गुन्हे दाखल केले होते अशी थेट कबुली राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी जाहीर सभेत दिली.

शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे ,मारहाण करणे असे अनेक गुन्हे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्यावर दाखल आहेत. या मध्ये मोहिते पाटील यांनी 27 गुन्हे दाखल केल्याचे ही जानकर यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT