Uddhav Thackeray  Saam Digital
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Lok Sabha Election 2024 : आज नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्रात सभा घेत आहेत. शिवसेना सोबत होती तेंव्हा एवढ्या सभा कधी घेतल्या नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना लगवला आहे.

Sandeep Gawade

सचिन कदम

आयपीएल बघताना समजत नाही कोण कुठून खेळतात हे कळत नाही तिथं बोली लावली जाते आता राजकारणात बोली लागते. रायगड शिवाजी महाराजांचा , त्यांनी काहीतरी विचार केला असेल इथल्या मातीचा आणि माणसांचे गुण ओळखले असतील, पण भाजप म्हणतंय चोरा मी वंदिले, अशी वेळ का आली ? आज नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्रात सभा घेत आहेत. शिवसेना सोबत होती तेंव्हा एवढ्या सभा कधी घेतल्या नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना लगवला आहे. माझ्यावर संकट आणून बघा हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. तुम्ही माझ्यासाठी संकट आहात. लोक चिडून उठलेत, ते वाट बघत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

जिथं जातो तिथं लोक सांगतात आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे माझे निवडणूक रोखे आहेत. अजित पवार, तटकरे यांच्यावर आरोप कुणी केले होते. मी गुजरात विरोधात कधीच नव्हतो गुजरातचा विकास करताना महाराष्ट्राच्या तोंडातील घास हिरावून घेता. अनेक प्रकल्प गुजरातला गेले. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर महाराष्ट्राचे वैभव परत आणणार आहे. तसंच भाजपने कितीही दरवाजे उघडले तरी मी येणार नाही, असं म्हटलं आहे.

नरेद्र मोदींच्या पराभवामुळे हिंदुस्तानात फटाके फुटतील. तुम्ही जिंकलात तर चायनामध्ये फटाके फुटतील. तुम्ही सर्वांना सर्वकाळ फसवू शकणार नाही. संपूर्ण देशाला जाग आलेली आहे. मंत्र्यांना न विचारता नोट बंदी केली. लोकांची मन की बात ऐकणारे आणि त्यांच्या भावना जाणणारे सरकार हवं आहे.

भाजप आणि नरेंद्र मोदी काश्मीरमधील हल्ले बंद झाल्याचं सांगत आहेत, मात्र काश्मीरमध्ये अजूनही हल्ले होतायेत. 10 वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात. मात्र तुमच्या नादनपणामुळे जवानांनी जीव गमावला. सत्यपाल मलिक यांनी तुम्हाला उघड पाडलं. याबद्दल का बोलत नाहीत. कधी महागाई बेरोजगारीवर बोलत नाहीत, बोलताना पाहिलंय का?''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT