Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Baramati Loksabha: बारामती मतदारसंघातील मतदान केंद्रांवर १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले.
Baramati Loksabha
Baramati LoksabhaSaam Tv

सागर आव्हाड

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून तिसरा टप्पा ७ मे ला पार पडत आहे. या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील देखील मतदान होणार आहे. उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी प्रथमोपचाराची सोय करण्यात आलीय.

मतदान केंद्रांवर १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले. मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघासाठी २३२, इंदापूर २५२, बारामती २८०, पुरंदर २४४, भोर ५२५ व खडकवासला १९१ याप्रमाणे १ हजार ७२४ कीटचे वितरण करण्यात आले. तर २ हजार ५१६ मतदान केंद्राना २५१६० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.

प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज, कापूस, बीटाडाईन ट्यूब, अँटीसेप्टीक सोल्युशन, हातमोजे, पॅरासिटामॉल, रँनटीडीन टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. किटचे वितरण सुलभतेने होण्यासाठी सर्व साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या पिशव्यांमध्ये भरुन पाठविण्यात आल्या. प्रत्येक पिशवीवर मतदारसंघाचे नाव लिहिण्यात आल्याने ती कीट मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे सोईचे होणार आहे. प्रथमोपचार साहित्य नेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वाहन व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान यंदा भावजयविरुद्ध नणंद असा सामना बारामतीत रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट उद्यास आले. दोन्ही गटांनी बारामती मतदारसंघात उमेदवार दिलेत. सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सुप्रिया सुळे ह्या सलग तीनवेळा खासदार झाल्यात. मात्र आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मतदानात उतरल्याने त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

Baramati Loksabha
Jalana News: ब्रेकिंग! मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घातला घेराव... जोरदार घोषणाबाजी; जालन्यात काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com