Ambadas Danve Vs Chandrakant Khaire Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद 'मातोश्री'वर मिटणार, दोन्ही नेत्यांचा शिंदे गटाच्या नेत्यासह विमान प्रवास

Ambadas Danve Vs Chandrakant Khaire: उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना मातोश्रीवर बोलावलं आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Rohini Gudaghe

Lok Sabha 2024 Maharashtra Politics

छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभा जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. गटातील दोन प्रमुख नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला (Maharashtra Politics) आहे. आता उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना मातोश्रीवर बोलावलं आहे. सकाळी साडे अकरा वाजता दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं आहे. (latest politics news

उद्धव ठाकरे गटातील या दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. आज वाद मिटविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं आहे. त्यामुळे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी एकत्र प्रवास केला ( Lok Sabha 2024) आहे. संभाजीनगर ते मुंबई असा त्यांनी एकत्रित प्रवास केला आहे. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ देखील त्यांच्यासोबत होते. तिन्ही नेते संभाजीनगरमधून एकत्रित प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आज मातोश्रीवर

अंबादास दानवे (Ambadas Danve) हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, मात्र चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय. त्यामुळे आज कोणाला उमेदवारी दिली जाणार (Lok Sabha Politics) आहे, याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंना एकत्र मातोश्रीवर बोलावलं आहे. त्यामुळं कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दानवेंचा चंद्रकांत खैरेंवर आरोप

शिंदे सेनेत जाण्यास अंबादास दानवे यांनी नकार दिला आहे. मात्र, मागील दहा वर्षांपासून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत, त्यामुळं या निवडणुकीत इच्छुक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला (Lok Sabha Election) आहे. शिवाय चंद्रकांत खैरे नेहमीच डावलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरेंवर आरोप केला. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दानवेंनी आपला दावा सांगितल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली (Ambadas Danve Vs Chandrakant Khaire) आहे. शिवाय उमेदवारीचा निर्णय मातोश्रीहून होईल, दानवे हे माझे शिष्य आहेत आणि मी त्यांचा गुरु असल्याचंही खैरेंनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT