udayanraje bhosale reaction after winning in satara lok sabha constituency  Saam Digital
लोकसभा २०२४

जिंकूनही उदयनराजे भाेसले नाराज, राजेंची पहिली प्रतिक्रया; नेमकं काय म्हणाले?

udayanraje bhosale reaction after winning in satara lok sabha constituency: मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेने सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल जि्ल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले.

Siddharth Latkar, ओंकार कदम

सातारा लाेकसभा मतदारसंघात भाजप खासदार उदयनराजे भाेसले यांनी विजय मिळविला असला तरी त्यांनी मिळालेल्या मतांवर नाराजी व्यक्त केली. निवडणूक जिंकली हे सत्य आहे मला थाेडा वेळ द्या यावर मी नंतर बाेलेन असं सांगत उदयनराजेंनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व आमदारांचे आणि मतदारांचे आभार मानले.

उदयनराजे म्हणाले माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ दिला त्यात मी काय मिळवलं. मी निवडणुक जिंकली हे सत्य आहे. लोकं कशाकडं बघुन मतं देतात हे कळत नाही. भ्रष्टाचार करायचा असेल‌ भ्रष्टाचार करु असा टाेमणा उदयनराजेंनी विराेधकांना मारला. लोकांनी मतांच्या माध्यमातुन दिलेली पोहोचपावती ही चिटुरकी सारखी.

मी पराभवाचा वचपा काढला नाही फक्त मला पटत नाही ते मी करत नाही. गेल्या वेळी मी जिंकून देखील पहिल्या तीन‌ महिन्यात राजीनामा दिला होता. उदयनराजेंनी शंभूराज देसाई , धैर्यशिल पाटील, मनोज घोरपडे, शिवेंद्रराजे आणि महेश शिंदे यांचे आभार मानले.

उदयनराजे भोसले विजयी घोषित

सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भाेसले हे प्रतिस्पर्धी उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विराेधात 32 हजार 771 मतांनी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले.

उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या

उदयनराजे भोसले : 5 लाख 71 हजार 134 मते

शशिकांत शिंदे : 5 लाख 38 हजार 363

डॉ. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले :1 हजार 395

या मतदारसंघात आनंद रमेश थोरवडे – 6 हजार 485, प्रशांत रघुनाथ कदम – 11 हजार 912, तुषार विजय मोतलिंग – 1 हजार 301, सयाजी गणपत वाघमारे – 2 हजार 501, सुरेशराव दिनकर कोरडे – 4 हजार 712, संजय कोंडिबा गाडे -37 हजार 62, निवृत्ती केरू शिंदे – 2 हजार 674, प्रतिभा शेलार – 1 हजार 123, सदाशिव साहेबराव बागल – 958 मते.

मारुती धोंडीराम जानकर – 3 हजार 951, विश्वजित पाटील – उंडाळकर – 3 हजार 438, सचिन सुभाष महाजन – 2 हजार 15, सीमा सुनिल पोतदार – 3 हजार 458, नोटा – 5 हजार 522 या प्रमाणे मते मिळाली आहेत. तसेच अवैध मतांची संख्या एकूण 2 हजार 180 आहे. प्रदत्त मते - 25 आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ नाराज? मंत्रिमंडळाच्या बैठकीला मारली दांडी

Blood cancer symptoms: भारतातील तरुणांमध्ये वाढतोय 'हा' ब्लड कॅन्सर; गंभीर आजारावर नवी थेरेपी ठरतेय फायदेशीर

Gold- Silver Price: सोनं-चांदीला चकाकी, दर वाढल्यामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ; जळगावच्या सुवर्णनगरीत आजचे भाव किती?

Manoj Jarange : मराठा आंदोलक मुंबईहून गावाकडे परतले अन् पोलिसांकडून धडाधड गुन्हे दाखल

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; १९२ पदांसाठी भरती;अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT