Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2024 saam tv
लोकसभा २०२४

Satara Constituency: सातारा लाेकसभा मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर नाही? उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Udayanraje Bhosale :

छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाद निर्माण केला जातो अशी खंत खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज पुन्हा एकदा व्यक्त केली. देव काेणी पाहिलेला नाही पण संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचे कार्य अजरामर असून युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. दरम्यान लोकसभेची जागा कधी तर जाहीर करावीच लागणार असे एका प्रश्नावर राजेंनी नमूद केले.

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन (Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2024) निमित्त आज (साेमवार) वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळास उदयनराजेंनी अभिवादन केले. त्यानंतर उदयनराजे भाेसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उदयनराजे म्हणाले छत्रपती संभाजी महाराज शुरता शौर्य याच प्रतीक होते. मरण पत्करलं पण कधी शरण गेले नाहीत. एका बाजूला संपूर्ण राज्य कारभार हाताने दुसऱ्या बाजूला बुधभूषण सारखे अनेक ग्रंथ वेगवेगळ्या भाषेत त्यांच्या खरोखर यांच्या तोडीचा पृथ्वीवरती दुसरा कुठेही योद्धा झाला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श त्यांना लाभला आणि जगाव कसं आणि तत्व कशाला म्हणतात हे आणि अनेक बरेच पैलू त्यांचे जे होते आपल्याला शिकायला मिळतात. सर्वधर्मसमभावाची जी काय छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती तीच त्यांनी संपूर्ण पुढे नेली.

आज शुरता वीरता याची आठवण येते या ठिकाणी स्मारक आहे. त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि शासनाने अधिकृत रित्या इतिहास वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित करावं अशी भावना उदयनराजेंनी व्यक्त केली. संभाजी महाराज यांचा सगळीकडे इतिहास पोहचला पाहिजे. तरुण पिढीला मार्गदर्शन मिळेल, चांगल आयुष कसं होईल ही इच्छा आहे. आज सगळ्यांच्या वतीने महाराजांना पुण्यतिथी निमित्ताने मानाचा मुजरा अर्पण करतो असेही राजेंनी म्हटले.

दरम्यान सातारा लाेकसभा मतदारसंघाची (satara lok sabha constituency) जागा अद्याप जाहीर झालेली नाही या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले लोकसभेची जागा कधी तर जाहीर करावीच लागणार आहे. जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर आराेप केलेल्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे आरोप होत राहणार.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT