- सागर आव्हाड
वंचित बहुजन आघाडीने आज (शनिवार) शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द केली आहे. याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी समाज माध्यमातून दिली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता फारूक अहमद म्हणाले वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे असेही फारूक अहमद यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.