Tamilisai Soundararajan Resigned  Google
लोकसभा २०२४

Telangana Politics: तेलंगणाच्या राज्यपालांचा राजीनामा, भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

Rohini Gudaghe

Telengana Governor Tamilisai Soundararajan Resigned

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी आज तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. सौंदरराजन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला (Telengana Politics) आहे. तमिळनाडूतून तमिलिसाई सौंदरराजन लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत माहिती देताना राजभवनाने सांगितले की, तेलंगणाच्या माननीय राज्यपाल आणि पॉंडेचेरीच्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी राजीनामा दिला आहे.  (latest politics news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातील जगतियाल येथे निवडणूक रॅली आणि तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे रोड शो करणार आहेत. याच दिवशी तमिलिसाई सौंदरराजन यांचा राजीनामा आला आहे. एका अधिकाऱ्याने (Telengana Governor Tamilisai Soundararajan Resigned) सांगितले की, त्या तामिळनाडू किंवा पॉंडेचेरीमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेलंगणाच्या राज्यपालांचा राजीनामा

तमिलिसाई यांनी पंतप्रधान मोदींना कळवल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत (Telengana Governor Resigned) आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, तमिलिसाई सौंदरराजन यांनी लोकसभा निवडणूक लढवून राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या पॉंडिचेरी किंवा चेन्नई किंवा थुथुकुडी येथून निवडणूक लढवू (politics news) शकतात.

याआधी फेब्रुवारीमध्ये तेलंगणाचे राज्यपाल म्हणून पाठवण्यापूर्वी भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष असलेल्या तमिलिसाई सौंदरराजन यांनी पुद्दुचेरीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच राहील, असं त्यांनी सांगितलं होतं.

पॉंडिचेरीतून निवडणूक लढवण्यासाठी प्राधान्य

लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तमिलिसाई यांनी पॉंडिचेरी येथे पत्रकारांना सांगितले की, माझी लोकप्रतिनिधी बनण्याची इच्छा आहे. परंतु मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या निर्णयाचं पालन (Lok Sabha Elections 2024) करेन. तमिलिसाई म्हणाल्या की, त्या निवडणूक लढवण्यासाठी पॉंडिचेरीला प्राधान्य देणार आहेत.

तमिलिसाई सौंदरराजन 2019 पर्यंत तामिळनाडू भाजपच्या प्रमुख होत्या. त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये त्यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. किरण बेदी यांना हटवल्यानंतर त्यांना पॉंडिचेरीच्या एलजीची जबाबदारीही देण्यात आली (Lok Sabha 2024) होती. सौंदरराजन या काँग्रेसच्या कुमारी अनंतन यांच्या कन्या आहेत. राज्यपाल बनण्यापूर्वी सौंदरराजन दोन दशकांहून अधिक काळ भाजपचा भाग आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT