Political News : ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात?; महाविकास आघाडीची आकडेवारी कशी बदलणार? वाचा

Maharashtra Political News : आमदार आमशा पाडवी शिंदे गटात पक्षप्रवेशाने ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ आणखी कमी होत आहे. ठाकरेंच्या आमदारांची संख्या सध्या 8 वर आहे.
Ambadas Danve
Ambadas DanveSaam TV
Published On

गिरीश कांबळे | मुंबई

Mumbai News :

विधानपरिषदेतील ठाकरे गटाचं संख्याबळ कमी होत असल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या 7 आमदारांचं संख्याबळ असलं तरी त्यामधील 3 आमदारांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकतं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच आमदार आमशा पाडवी यांच्या शिंदे गटात प्रवेशाने ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ आणखी कमी होत आहे. ठाकरेंच्या आमदारांची संख्या सध्या 8 वर आहे, तर आमशा पाडवी यांच्या पक्षप्रवेशामुळे ही संख्या 7 वर येणार आहे. (latest politics news)

ठाकरे गटाचे सध्याचे 7 आमदार आणि त्यांचा संपण्याचा कार्यकाळ

  • सचिन अहिर - 7 जुलै 2028

  • उद्धव ठाकरे - 13 मे 2026

  • नरेंद्र दराडे - 21 जुन 2024

  • अंबादास दानवे - 21 ऑगस्ट 2025

  • अनिल परब - 27 जुलै 2024

  • विलास पोतनिस - 7 जुलै 2024

  • सुनील शिंदे - 1 जुलै 2028

Ambadas Danve
Rahul Gandhi: भारतात द्वेष पसरवला जातोय; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

काँग्रेस सध्याचे आमदार आणि त्यांचा संपण्याचा कार्यकाळ

  • जयंत आसगावकर – 6 डिसेंबर 2026

  • भाई जगताप – 7 जुलै 2028

  • सतेज पाटील – 1 जानेवारी 2028

  • वजाहत मिर्झा – 27 जुलै 2024

  • राजेश राठोड – 13 मे 2026

  • धीरज लिंगाडे – 7 फेब्रुवारी 2029

  • अभिजीत वंजारी – 6 डिसेंबर 2026

  • प्रज्ञा सातव – 27 जुलै 2024

शरद पवार गटाचे सध्याचे आमदार आणि त्यांचा संपण्याचा कार्यकाळ

शशिकांत शिंदे - 13 मे 2026

एकनाथ खडसे - 7 जुलै 2028

अरुण लाड - 6 डिसेंबर 2026

Ambadas Danve
Mahavikas Aghadi : वंचितला कोणताही नवीन प्रस्ताव जाणार नाही; मविआच्या बैठकीत एकमत

महाविकास आघाडीचे सध्याचं संख्याबळ

  • ठाकरे - 7

  • काँग्रेस - 8

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 3

महाविकास आघाडीचं जुलै महिन्यानंतरचं संख्याबळ

  • ठाकरे गट - 4

  • काँग्रेस - 6

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट- 3

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com