Rahul Gandhi: भारतात द्वेष पसरवला जातोय; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: महात्मा गांधी यांचे खापर पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासह इतरांना शपथ दिली आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam Tv
Published On

सचिन गाड

Rahul Gandhi In Maharashtra

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. त्यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झालेली आहे. या यात्रेचा आज मुंबईत समारोप होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची सभा पार पडणार आहे. राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेत लाखो लोकं माझ्या बरोबर चालत होते. यात्रेची शक्ती ही सगळी लोकं होती. ही भाजपसोबतची लढाई नसून दोन आत्म्यामधील लढाई आहे. (latest politics news

शेतकरी मजुराला काही ज्ञान नाही, अशी त्यांची विचारसरणी आहे. देशातील वैज्ञानिकता जेवढं ज्ञान आहे, तेवढंच ज्ञान शेतकऱ्याला देखील आहे. ही दोन विचारसरणीची लढाई आहे. घाबरायचं कारण नाही, भाजप आलं तरी संविधानाला ते संपवू शकत (Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra) नाही. त्यांच्यात तेवढी धमक नाही, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी माध्यमांना ताब्यात घेतलं आहे. सत्य आणि हिंदुस्तान आपल्या सोबत आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आमची यात्रा निघाली. द्वेषाचा भारत देश नाही.भारतात प्रेम आहे. भारत हा प्रेमाचा देश असताना द्वेष का पसरवला जात आहे, असा सवालही त्यांनी विचारला आहे. आपण म्हणतोय की, भाजप द्वेष पसरवत आहे. मात्र, त्याचं मूळ मी शोधलं (Rahul Gandhi News) आहे. देशात अन्याय होतोय त्यामुळे द्वेष वाढत चाललाय. देशातील फक्त दोन-तीन टक्केच लोकांना न्याय मिळत आहे. सरकारी यंत्रणा त्यांच्यासाठी काम करत आहे. देशातील ९० टक्के लोकांसोबत २४ तास अन्याय होतोय. शेतकऱ्यांचा एक रुपया माफ केला गेला नाही. मनरेगापासून गरीब व्यक्तींची सवय बिघडून जात (Rahul Gandhi In Maharashtra) आहेत. दुसरीकडे वीस पंचवीस लोक आहेत, त्यांचं 16 लाख करोड रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. त्यालाच हे विकास, प्रगती असं सगळं म्हणत राहतात. गरिबांकडून सगळं श्रीमंतांना दिलं जातं आहे, हे मला यात्रेमध्ये प्रवास करताना कळलं.

पेपर फुटत आहेत. व्यापाऱ्यांना जीएसटीमधून दबाव टाकत आहेत. अनेक लोक त्यांच्यावर होणारा अन्याय मला सांगत होते. यात्रेत फक्त मी एकटा चालत नव्हतो. लाखो लोकं चालत (Maharashtra Politics) होते. ही लढाई राहुल गांधी आणि मोदी यांच्या विरोधात नाही. आपण आपल्या भावावर जोपर्यंत अन्याय होतोय हे बघत नाही. तोपर्यंत सर्वांवर अन्याय होणार आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

Rahul Gandhi
Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज शिंदे गटात प्रवेश

यात्रेत फक्त मी एकटा चालत नव्हतो, तर लाखो लोकं चालत होते. ही लढाई राहुल गांधी आणि मोदी यांच्याविरोधात नाही, तर ही लढाई सेंट्रलाइज करण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या लोकांविरोधात (Lok Sabha 2024) आहे. आम्ही इंडिया सरकार आलं तर काय करू, अशा गॅरंटी दिल्या आहेत. या फक्त काँग्रेसच्या गॅरंटी नाहीत. या भारतीयांच्या समस्या आहेत. भाजप हे काम करू शकत नाही. ते सेंट्रलाइज (Rahul Gandhi Criticized PM Modi) आहेत. आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ज्ञान फक्त एका व्यक्तीकडे आहे. भाजप सरकार आलं तर संविधान संपवतील, असं काही नाही. घाबरू नका, सत्यता आणि भारतीय आपल्यासोबत आहे.

महात्मा गांधी यांचे खापर पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासह इतरांना शपथ दिली (Lok Sabha 2024 Rahul Gandhi) आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सरकारद्वारे संविधान, स्वातंत्र्य, आंदोलनाचा हक्क तसेच आपल्या सभ्यतेवरील हल्याविरोधात निवडणुकीत या देशविरोधी सरकार आणि सहयोगी पक्ष हरवून इंडिया आघाडीच्या पक्षांना विजयी करण्यासाठी त्यांनी शपथ दिली आहे.

Rahul Gandhi
Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज शिंदे गटात प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com