राहुल गांधी यांच्या नेतृ्त्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत शिवतिर्थावरील भव्य सभेनंतर होणार आहे. मणिपूरमधून सुरू झालेल्या आणि जवळपास 66 दिवस चालेल्या या यात्रेचं महाराष्ट्रात नंदुरबारमधून आगमन झालं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्या या यात्रेला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या राहुल गांधी यांचा पालघरमध्ये रोड शो सुरू असून रविवारी शिवतीर्थावर होणाऱ्या त्यांच्या सभेचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
न्यायाची लढाई अन्यायाच्या विरोधात, भारत जोडो न्याय यात्रा. न्यायासाठी लढायचं, संविधानाला टिकवायचं, वसा महाराष्ट्राच्या मातीचा, संघर्षाचा आणि लढण्याचा, अशा आशयाखाली हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात राहुल गांधी यांचा भव्य रोड शो दाखवण्यात आला असून ते जनतेला अभिवादन करताना दिसत आहेत. रोड शो ला प्रचंड गर्दी दिसत आहे. १७ मार्चला सायंकाळी ५ वाजता शिवतिर्थावर ही भव्य सभा होणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लोकांचे लक्ष केंद्रित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहिला आहे.
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रेचा 15 राज्यांतील 100 लोकसभा मतदारसंघातून प्रवास झाला आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी 6713 किमी बसने आणि पायी प्रवास केला आहे. 66 दिवसांच्या या यात्रेअंतर्गत 110 जिल्हे, 100 लोकसभा आणि 337 विधानसभा मतदारसंघात सभा घेण्यात आल्या. 20 किंवा 21 मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होणार होता मात्र तीन दिवस आधीच यात्रा मुंबईत पोहोचणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात आगमन झालं आहे. चांदवडमध्ये राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा पार पडला. शेतकऱ्यांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, इथं सर्वात मोठा मुद्दा कांद्याचा भावाचा आहे. मागील दहा वर्षात मोदी सरकारने आपलं एक रुपये तरी माफ केलं का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. बोलताना ते म्हणाले की, सर्वात श्रीमंत अरबपतीचं 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आहे. कॉंग्रेसचं सरकरा असताना एकदा कर्ज माफ केलं होतं. परंतु भाजपने एकदाही कर्ज माफ केलं नाही. त्यांनी फक्त 20-25 लोकांचं कर्ज माफ केलं आहेत. त्यातून 24 वेळा कर्ज माफ झालं असतं, असंही ते म्हणाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.