Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Maharashtra Exit Poll : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघातून काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात काट्याची टक्कर आहे. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोण संभाव्य आमदार असू शकतो? वाचा सविस्तर
jat vidhan Sabha Vikramsingh sawant vs Gopichand Padalkar
jat vidhan Sabha Vikramsingh sawant vs Gopichand Padalkarsaam tv
Published On

विजय पाटील, सांगली

सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील काँग्रेसचा दबदबा येथे पाहायला मिळाला. या निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराचं पारडं जड असल्याचं मानलं जात आहे.

जतमध्ये विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे संभाव्य आमदार असतील. भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं होतं. विधानपरिषदेचे आमदार पडळकर यांनी तगडी लढत दिली. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सावंत हे आमदार होऊ शकतात.

जत विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. स्थानिक उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी मोठा विरोध झाला. भाजपने पडळकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर बंडखोरी झाली. त्यामुळे भाजपला मोठा बसू शकतो. काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत विरुद्ध पडळकर अशी लढत असतानाही बंडखोर उमेदवार रवी तमन गोंडा यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले. तिहेरी लढतीत बंडखोरीचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

jat vidhan Sabha Vikramsingh sawant vs Gopichand Padalkar
Maharashtra Exit Poll: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, चंद्रकांत पाटील संभाव्य आमदार? VIDEO

आता प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच चित्र स्पष्ट होईल. एक्झिट पोलचे आकडे किंवा अंदाज प्राथमिक आहेत. आता २३ तारखेला आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडते, मतदार कुणाला पसंती देतात हे निश्चित होईल.

jat vidhan Sabha Vikramsingh sawant vs Gopichand Padalkar
Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com