Maharashtra Exit Poll: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का, चंद्रकांत पाटील संभाव्य आमदार? VIDEO

Saam Exit Poll: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकात पाटील विजयी होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Exit Poll
Maharashtra Exit PollSaam Tv
Published On

मुक्ताईनगर हा मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मुक्ताईनगर या मतदारसंघात पूर्वीपासून एकनाथ खडसे यांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात आता खडसेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात आता शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील जिंकण्याची शक्यता आहे.

Maharashtra Exit Poll
Khadakwasla Exit Poll : तिरंगी लढतीत कोण जिंकणार? खडकवासल्याचा एक्झिट पोल काय सांगतो?

मुक्ताईनगर हा रोहिणी खडसे यांचा गड मानला जायचा. या मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट हे आमनेसामने आहेत. रोहिणी खडसेंच्या या बालेकिल्ल्यात आता शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहेत.

रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षदेखील आहेत.त्यांना मुक्ताईनगरमध्ये येथे पराभवाला सामोरे जावे लागू शकते. या मतदारसंघात एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु या मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव होऊ शकतात. (Maharashtra Exit Poll)

मुक्ताईनगरमध्ये विद्यमान आमदार चंद्रकात पाटील पुन्हा एकदा आमदार होऊ शकतात. त्यांनी विकासकामांच्या जोरावर मते मांडली आहेत. या मतदारसंघात एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे यांच्यासाठी प्रचार केला होता. परंतु या मतदारसंघात रोहिणी खडसे यांना लोक नाकारतील, असं दिसत आहे.

Maharashtra Exit Poll
Maharashtra Exit Poll: कर्जत खालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे होणार आमदार? पाहा Exit Poll

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com