लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रमुख लढत झाली. अशामध्ये या मतदारसंघामध्ये भाजप विजयी होणार की ठाकरे गट हे उद्याच्या निकालानंतर कळेल. पण सकाळचा एक्झिट पोल समोर आला असून त्यामध्ये भाजप विजयी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळच्या एक्झिट पोलनुसार, औसा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पारडं जड दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघामध्ये महायुतीतील भाजपकडून अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी निवडणूक लढवली. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून दिनकर बाबुराव माने यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये भाजप आणि ठाकरे गट यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली असून अभिमन्यू पवार हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा अभिमन्यू पवार हेच औसा मतदारसंघाचे संभाव्य आमदार असतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी विजय मिळवला होता. ठाकरे गटाचे दिनकर माने हे या मतदारसंघात आधी आमदार राहिले आहेत. अभिमन्यू पवार यांनी या मतदारसंघात चांगले काम केले आहे त्यामुळे ते पुन्हा आमदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.