Sharad Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Sharad Pawar: रायगडमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, पुढील प्रवासासाठी रस्ते मार्गे रवाना

Raigad News: एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर येत आहे. राजगड येथे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समजतं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar News:

एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर येत आहे. राजगड येथे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समजतं आहे.

हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे, हेलिकॉप्ट मधून उतरून बाय रोड पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगडनंतर शरद पवार यांची सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदार संघातील वारजे येथे सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र त्यामध्ये तांत्रिक बिघड झाल्यानं चारचाकी गाडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर पाहण्यासाठी स्थानिकांची हेलिपॅडवर मोठी गर्दी केली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

दरम्यान, सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांचे हेलिकॉप्टर टेक ऑफ करताना अचानक असंतुलित झाले. यादरम्यान पायलटने हेलिकॉप्टर मागे वळवले आणि नंतर उड्डाण घेतली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शाह हे जाहीर सभेला संबोधित करून परतत असताना हेलिकॉप्टरचा तोल बिघडला. अमित शहा यांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, असंही सांगण्यात येत आहे. बेगुसराय येथे हेलिकॉप्टरला जोरदार वाऱ्याचा फटका बसला. मात्र, काही वेळाने हेलिकॉप्टरने उड्डाण घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT