महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं काम ज्या पक्षातील कार्यकर्ता पदाधिकारी करणार नाही त्यांना पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारी देणार नाही अस जाहीरपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ तालुका प्रचारप्रमुख बापू भेगडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यावर टिप्पणी करताना मावळचे आमदार यांनी हा नियम केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठी लागू नसून भाजपला देखील लागू असल्याची म्हटले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
मावळ तालुक्यात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाषणातून भाजपावर निशाणा साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच सुनील शेळके यांनी व्यासपीठावर विरोधातील सर्वच एकत्र आल्याने सगळ्यांच्या गळ्यात पडू की काय करू समजेना असा टोला लगावला.
त्यांनंतर शेळके यांनी भाजपच्या गळ्यात पडायला गेलो तर भाजप म्हणेल की गळ्यात पडायला गेला तर तुला कस ढकलतो याचा विचार करतोय पण भाजपला हे माहीत नाही की मी पण त्यांच्याखाली मी पण सुरुंग लावून बसलोय. यानंतर संपूर्ण मेळाव्यात हशा पिकला. मात्र असे बोलत थेट भाजपच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कट्टर विरोधक असल्याचे यानिमित्ताने आमदार सुनील शेळके यांनी अधोरेखित केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोणत्या मुहूर्तावर मी आमदार झालो हेच मला कळेना. जो मुहूर्त सांगितलं त्या मुहूर्तावर फॉर्म भरला. पण पाच वर्षात अस काही चित्र पाहिलं आहे की पुढील 25 वर्षांत होणार आमदार देखील बघणार नाही. या दरम्यान सकाळच्या शपथविधी पाहिला असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. सगळ्या पक्षाबरोबर सत्तेत राहिलो आणि विरोधात देखील बसलो. पण मावळच्या जनतेसाठी जिथे जायची वेळ आली तिथे देखील जाऊन मान अपमान सहन केल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपला सुनील शेळकेंचा टाेला
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं काम ज्या पक्षातील कार्यकर्ता पदाधिकारी करणार नाही त्यांना पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारी देणार नाही अस जाहीरपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ तालुका प्रचार प्रमुख बापू भेगडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यावर टिप्पणी करतांना मावळचे आमदार यांनी हा नियम केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठी लागू नको तर शेजारी बसलेल्या भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी देखील लागू असावा असे सांगितले. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू असलेली भांडण बघून भाजप यांचं चांगलं चाललं आहे म्हणेल.
त्यानंतर व्यासपीठावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सगळं सगळ्याना लागू आहे असं उत्तर मावळच्या आमदारांना दिले. मात्र आमदार सुनील शेळके यांनी यावर प्रतिउत्तर देत सगळं सगळ्यांना लागू आहे तर बाकी मोबाईलवरून लाईव्ह का बघतात उपस्थित का नाही असा सवाल केला.
आजच्या महायुतीच्या मेळाव्याला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन मराठे आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते गैरहजर असल्याने आमदार शेळके यांनी हा टोला भाजपला लगावला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.