Sanjay Mandlik Income: खासदार संजय मंडलिकांच्या संपत्तीत काेट्यावधींची वाढ, प्रतिज्ञापत्रात कर्जाचाही उल्लेख

Maharashtra Election 2024: Kolhapur Lok Sabha Constituency Update | खासदार संजय मंडलिक यांच्यावर ३ कोटी ४१ लाख १८ रुपयांचे कर्ज आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केली आहे.
Kolhapur Lok Sabha Constituency Candidate Mp Sanjay Mandalika's Wealth Increased By Crores
Kolhapur Lok Sabha Constituency Candidate Mp Sanjay Mandalika's Wealth Increased By CroresSaam Tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur Constituency :

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (kolhapur loksabha election 2024) महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (mp sanjay mandlik) यांनी पुन्हा एकदा लोकसभेला शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (shahu maharaj chhatrapati) यांच्या विरोधात त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या पाच वर्षात मंडलिक यांच्या संपत्तीत साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 27 हजार इतकी आहे. तर व्यवसायाने शेतकरी असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती विवरणपत्र जोडले आहे.

Kolhapur Lok Sabha Constituency Candidate Mp Sanjay Mandalika's Wealth Increased By Crores
Ratnagiri Sindhudurg Constituency : उदय सामंतांच्या वक्तव्याने तळकाेकणातील राजकारण ढवळून निघालं, विनायक राऊत, वैभव नाईक राणेंवर तुटून पडले (पाहा व्हिडिओ)

खासदार मंडलिक यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 15 लाख, 32 हजार 525 असून तसेच 13 कोटी 21 लाख 95 हज़ार 873 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद आहे. खासदार मंडलिक यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसून मंडलिक यांनी आपला व्यवसाय शेतकरी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नी मात्र व्यावसायिक आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गत निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता 9 कोटी 71 लाख 71 हजार रुपये इतकी होती. ती आता वडीलोपार्जित मालमत्तेसह 14 कोटी 37 लाख 28 हजार 398 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा विचार करता त्यांची मालमत्ता 7 कोटी 61 लाख रुपयांनी वाढली आहे.

खासदार मंडलिक यांच्याकडे वारसाप्राप्त मालमत्ता

९ कोटी २० लाख ९१ हज़ार ५२० रुपये.

३ कोटी ४१ लाख १८ रुपयांचे कर्ज.

स्कोड़ा,ऍक्टिव्हा वाहन.

३५ लाख ९२ हज़ार ५০০ रुपये किंमतीचे सोने.

Edited By : Siddharth Latkar

Kolhapur Lok Sabha Constituency Candidate Mp Sanjay Mandalika's Wealth Increased By Crores
RTE Admission : पालकांनाे! ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जाणून घ्या संकेतस्थळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com