vaibhav naik kiran samant vinayak raut uday samant statement on ratnagiri sindhudurg constituency
vaibhav naik kiran samant vinayak raut uday samant statement on ratnagiri sindhudurg constituency Saam Digital

Ratnagiri Sindhudurg Constituency : उदय सामंतांच्या वक्तव्याने तळकाेकणातील राजकारण ढवळून निघालं, विनायक राऊत, वैभव नाईक राणेंवर तुटून पडले (पाहा व्हिडिओ)

तळकोकण आणि धनुष्यबाण याचा एक वेगळं असं अलौकिक नातं आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे. ही जर जागा शिवसेनेला मिळाली तर आमचा उमेदवार एकमताने ठरलेला आहे असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

- अमोल कलये / पराग ढाेबळे

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election :

रत्नागिरी सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज उद्याेगमंत्री उदय सामंत (uday samant)  यांनी महायुतीत (mahayuti) कुठेही बंडखोरी नाही. आम्ही संयमी आहोत. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. किरण सामंत (kiran samant)  माझे मोठे बंधू आहेत, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. दूसरीकडे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन नये असे आवाहन आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी केले तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी आम्ही तिस-यांदा विजयी हाेणार असा विश्वास व्यक्त केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरी मतदारसंघाबाबत उदय सामंत माध्यमांशी बाेलताना म्हणाले आमची भूमिका वारंवार मांडली आहे. शिवसेनेने दावा केलेला आहे. गेल्यावेळी एक लाख 75 हजार मतांनी आम्ही जिंकलो होतो. त्यावेळी निवडून आलेले खासदार हे शिंदे सोबत आलेले नाही.

vaibhav naik kiran samant vinayak raut uday samant statement on ratnagiri sindhudurg constituency
Unseasonal Rain Hits Wardha: गारपिटीच्या तडाख्यात शेत शिवार, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात अश्रु; मदतीसाठी कार्यवाही सुरु : धनंजय मुंडे

तळकोकण आणि धनुष्यबाण याचा एक वेगळं असं अलौकिक नातं आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे. ही जर जागा शिवसेनेला मिळाली तर आमचा उमेदवार एकमताने ठरलेला आहे असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उदय सामंत म्हणाले किरण सामंत परवा येऊन उपमुख्यमंत्र्यांना भेटून गेले आहेत. समाधानकारक चर्चा झाली आहे आणि किरण सामंत यांनी त्यांचा स्वतः मत मांडलं आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण तिथे आवश्यक आहे आणि आमचा उमेदवार हा एकमताने ठरलेला आहे. उमेदवार अर्ज घेणे हे काही मोठं नाही, राणे साहेबांनी देखील अर्ज घेतला आहे. कोणीतरी अर्ज भरलेला देखील आहे.

vaibhav naik kiran samant vinayak raut uday samant statement on ratnagiri sindhudurg constituency
Sangli Constituency: पक्ष माझी उमेदवारी जाहीर करेल, विशाल पाटलांना विश्वास; सांगली मतदारसंघ आमचाच, पण... : बाळासाहेब थाेरात

किरण सामंतांनी वैभव नाईक यांना किती मदत केली. माणुसकी म्हणून याचा कधीतरी विचार करावा ते ठाकरे गटात आहेत ते शिंदे साहेबांसोबत यावं यावं किती वेळा भेटावं रात्री दोन वाजता भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी आणि ते कॉलेजमध्ये देखील एकत्र होतो म्हणून उगाच मातोश्रीला खुश करण्यासाठी काही गोष्टी करू नये. मित्रत्वाचे संबंध हे राजकारणामुळे तुटू नये हा माझा त्यांना सल्ला आहे.

किरण सामंत यांनी माघार घेऊ नये : आमदार वैभव नाईक

दरम्यान विनायक राऊत तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहेत. मोठ्या शक्तीप्रदर्शनाने विनायक राऊत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले गेल्या वेळेपेक्षा यावेळी जास्त मताधिक्यांनी निवडून येतील असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला. भाजपची दहावी उमेदवारी यादी देखील जाहीर झाली मात्र नारायण राणेंचं नाव त्या यादीत नाही. यामागे भाजपच्याच अदृश्य शक्तींचा हात आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. किरण सामंत यांनी निवडणुकीत घेतलेले उमेदवारी अर्ज मागे घेऊ नयेत असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या गद्दारांना तिस-यांदा पराभूत करण्याची संधी : विनायक राऊत

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. एकीकडे महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही मात्र आपणच विजयी होण्याचा पक्का निर्धार विनायक राऊत यांनी केला. किरण सामंत किंवा नारायण राणे या दोघांनी अर्ज घेतला असला तरी कुणाचाही आव्हान असणार नाही. जिंकायचा हा एकच विषय नजरेसमोर ठेवून काम शिवसेनेच्या गद्दारांना तिस-यांदा पराभूत करण्याची संधी मला प्राप्त झाली असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

vaibhav naik kiran samant vinayak raut uday samant statement on ratnagiri sindhudurg constituency
Satara Constituency: उदयनराजे, शिवेंद्रराजेंचे आव्हान कसं पेलणार? शशिकांत शिंदेंनी हसत हसतच सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com