Milind Narvekar Saam Tv
लोकसभा २०२४

Milind Narvekar: मिलिंद नार्वेकरांना महायुतीची मोठी ऑफर? 'मातोश्री'चा दूत शिंदेचा उमेदवार होणार?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

साम टिव्ही ब्युरो

Milind Narvekar News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्याची ऑफर नार्वेकरांना दिल्याची माहिती आहे. मात्र नार्वेकर कुठेही जाणार नाही, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केलाय.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरीही दक्षिण मुंबईच्या जागेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा शोध संपलेला नाही. ठाकरे गटाच्या पहिल्याच यादीत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. महायुतीकडून दक्षिण मुंबईसाठी भाजपच्या राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटाच्या यशवंत जाधव यांचं नाव चर्चेत होतं. मध्यंतरी मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा झाली. मात्र अरविंद सावंतांविरोधात सक्षम उमेदवार न मिळाल्यामुळे अखेर मिलिंद नार्वेकर यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय.

शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहचले होते. या भेटीनंतर मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.. आता पुन्हा एकदा शिंदे गट नार्वेकरांच्या स्वागतासाठी सज्ज झालाय.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

मिलिंद नार्वेकरांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून राजकारणात त्यांना ओळखलं जातं. जेव्हा जेव्हा शिवसेना संकटात आली तेव्हा तेव्हा नार्वेकर यांनी संकटमोचकाची भूमिका निभावलीय. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातून मिलिंद नार्वेकरांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. 1992 च्या महापालिका निवडणुकीआधी त्यांचा वॉर्ड विभागला गेला. नवीन वॉर्डचं शाखाप्रमुख पद मिळेल या आशेने मिलिंद नार्वेकरांनी पहिल्यांदा 'मातोश्री'त प्रवेश केला. इथेच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले आणि पुढे हळूहळू शिवसेनेत स्थिरस्थावर होत गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंची वेळ देणं, नेते-कार्यकर्त्यांचे फोन घेणं, दौरे आखणं ही जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर असायची. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असल्याने मिलिंद नार्वेकरांचं शिवसेनेतलं प्रस्थ हळूहळू वाढत गेलं.

शिवसेनेतील फुटीनंतर मिलिंद नार्वेकर ठाकरेंचे दूत म्हणून शिंदेंच्या भेटीसाठी सूरतला गेले होते. ही भेट निष्फळ ठरलीच उलट नार्वेकरांसोबत सुरतला गेलेले रवींद्र फाटकही शिंदे गटात सहभागी झाले. नार्वेकरही शिंदेंसोबत जातील अशा चर्चा अनेकदा झाल्या. मात्र नार्वेकरांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. आता लोकसभेच्या जागेसाठी मातोश्रीचे दूत शिंदेंचे उमेदवार होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT