Sharad Pawar: 10 वर्षांपासून तुमचं सरकार आणि तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? शरद पवार भाजपवर कडाडले

Sharad Pawar On BJP: 10 वर्षांपासून तुमचं सरकार आणि तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
10 वर्षांपासून तुमचं सरकार आणि तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? शरद पवार भाजपवर कडाडले
Sharad Pawar On BJPSaam tv

Sharad Pawar On BJP:

>> अमर घटारे

10 वर्षांपासून तुमचं सरकार आणि तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ''देशात महिलांवर अत्याचार होत आहे. आमच्या काळात एकही अत्याचार झाले नव्हते. मणिपूरला आम्ही शिष्टमंडळ पाठवलं, तेव्हा असं कळलं की, त्यांच्या घरावर हल्ले झाले. अत्याचार झाले आणि सरकारने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. अमरावती येथे प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले, कोरोना काळात अनेक लोक आपल्या गावात गेले. पण लोकांना न्याय देण्याच काम सरकारने केलं नाही. राज्यात सर्व शेतकरी संकटात आहे, त्यामुळे तिथे आपलं वजन असणं गरजेचं आहे.

शरद पवार म्हणाले की, ''आम्ही या निवडणुकीला महत्त्व देत आहोत, कारण चिंता आहे की, ही निवडणूक शेवटची ठरू नये. देशाच्या अनेक पंतप्रधानांना मी पाहिलं, आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली.'' ते मानले,या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com