Sharad Pawar Vs Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

साम टिव्ही ब्युरो

Shirur Lok Sabha Constituency:

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधलाय. उमेदवार मिळेना म्हणून थेट महायुतीतल्या एकनाथ शिंदेंचाच उमेदवार फोडून कोल्हेंविरोधात उतरवला. म्हणूनच शरद पवारांनीही अमोल कोल्हेंसाठी पॉवरफुल प्रचार करण्याची तयारी केलीय. शरद पवार शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी 6 सभा घेणार आहेत.

शिरूरमध्ये 'पॉवरफुल' प्रचार

शिरूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे. शिरूर, हडपसर, आंबेगाव, खेड -आळंदी आणि भोसरीमध्ये पवारांची मॅरेथॉन सभा होईल. तर एकट्या जुन्नर विधानसभेत शरद पवारांच्या दोन सभा होणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे ठाकरे आणि आदित्य ठाकरेही भोसरी विधानसभेत प्रचार रॅली काढणार आहेत.

अमोल कोल्हेंसाठी पवार मैदानात!

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर कार्यकर्ते दोन गटात विभागलेत. अमोल कोल्हेंनी शरद पवारांना साथ दिल्याची सल अजित पवारांच्या मनात आहे, असं बोललं जातं. म्हणूनच अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिलंय. अजित पवारांच्या आव्हानानंतर शरद पवारांनीही कोल्हेंच्या पाठीमागे मोठी फळी उभी केलीय. शरद पवारांनी 6 सभाचं आयोजन करून अमोल कोल्हेंच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचे संकेत दिलेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते आता प्रचाराच्या मैदानात उतरलेत. शिरुरमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई जुंपलीय. आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही नेते पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. मात्र काका पुतण्याच्या लढाईत नेमका कुणाचा उमेदवार शिरुरचं मैदान मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

SCROLL FOR NEXT