Sharad Pawar Meet Madha Loksabha Constituency News: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: पश्चिम महाराष्ट्राचे दिग्गज एकत्र! माढा- सोलापूरसाठी जोरदार फिल्डिंग; मोहिते पाटलांच्या बंगल्यावर काय काय ठरलं?

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी|ता. १४ एप्रिल २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरी स्नेहभोजन केले. यावेळी शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. या भेटीदरम्यान माढा तसेच सोलापूर लोकसभेसाठी रणनिती आखण्यात आल्याचे बोलले जात आहे.

माढा सोलापूरसाठी जोरदार फिल्डिंग!

माढा लोकसभा मतदार संघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माढ्यातून शरद पवार गटाकडून माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील मैदानात उतरणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर १६ एप्रिलला ते अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बैठकीय काय काय ठरलं!

१६ तारखेला माढा आणि सोलापूर संदर्भात बैठक होईल. एकत्रपणे काम करण्याचा निर्णय झाला आहे. प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते हे मोठ्या मताने विजयी होतील अशी खात्री सहकाऱ्यांनी दिल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे करमाळ्याचे माजी आमदार रघुनाथ आबा पाटील यांचाही शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. त्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शरद पवार, शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र...

या लंच डिप्लोमसीमध्ये सोलापूर आणि माढा लोकसभेसंदर्भात चर्चा झाली. सोलापूर आणि माढा लोकसभा जिंकण्यासाठी कामाला लागा असे निर्देश देत शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सोलापूर शी जुनं नातं आहे आणि ते कायम ठेऊन पुढे काम करत रहा, असा कानमंत्रही सुशिलकुमार शिंदे आणि शरद पवार यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT